कोण म्हणतं एकदा वेळ निघुन गेली की परत येत नाही…
‘ती सध्या काय करते ‘ हा सिनेमा पाहिला आणि या विषयावर थोडा विचार करावासा वाटला.
‘ती सध्या काय करते’ यावरून बरेच विनोद झाले, अतिशयोक्ती झाली. यातला विनोदाचा भाग सोडला तर हा विषय मनाच्या खुप जवळचा वाटला. यातल्या अन्याचा बायकोची (उर्मिला कानेटकर) भुमिका मनाला स्पर्श करून गेली.
सध्या आपण पहातोय की, रि-युनियन हा विषय निघाला की पत्नी पती कडे किंवा पती पत्नी कडे संशयाच्या नजरेने पाहतात. पण खरं सांगू ? लग्नाची २०-२५ वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवल्यावरही आपण आपल्या जोडीदारावर विश्वास ठेऊ शकत नसलो तर आपण काय सहजीवन जगलो ? लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हेच खरं.. नाहीतर तुमचा जोडीदार शाळा-काँलेज मधे असतानाच सैराट झाला असता, नाही का ? पण तो संयमी आहे, विचारी आहे म्हणून आज तुमच्या जोडीला आहे. आज २५ वर्षांच्या संसारा नंतर ब्रम्हदेवही आले तरी तुमची गाठ सोडू शकणार नाही असा विश्वास हवा..
एकदा सरलेले बालपण/तारूण्य पुन्हा मिळत नाही, या विचारावर रि-युनियन या संकल्पनेने मात केली आहे. ज्याने कोणी ही संकल्पना शोधून काढली, त्याला सलाम
शाळा काँलेज मधिल मित्र मैत्रिणींना भेटा, त्यांचाशी गप्पा मारा, सरलेले बालपण- तारूण्य तुम्हाला परत मिळेल, नक्कीच ! आयुष्यात राहून गेलेली सगळी मजा उपभोगण्यासाठी पुन्हा एकदा मिळालेली ही सुवर्णसंधी आहे.
खुप फिरा, मजा करा ! ४०-४५ हे वय असं आहे की, अजुनही तुम्ही भ्रमंती करू शकता. एकदा का साठी आली, की पुन्हा हळहळ वाटेल, आलेली संधी गमावल्याची. आणि करा की प्रपोज राहून गेलेलं ! काय हरकत आहे ?
मनावर नियंत्रण असलं की सगगळच सुंदर असतं/अम्रुत असतं. आपली द्रुष्टी स्वच्छ असली की सगळच स्वच्छ दिसतं. म्हणूनच कोणतीही अतिशयोक्ती टाळून मजा घ्या जीवनाची.
आणि मनावर नियंत्रण होतं म्हणून विधीलिखित जोडीदारा बरोबर तुम्ही संसाराची पंचविशी गाठू शकलात. चुकणारा माणूस कुठेही चुकतो, त्याला रि-युनियनच निमित्त लागत नाही.
तुमच्यातले काही सुप्त कलागुण संसाराच्या धकाधकीत दबून गेलेले असतात, पण तुमचे मित्र ते बरोबर जाणतात. ते सादर करण्याची, त्याचा आनंद घेण्याची संधी म्हणजे रि-युनियन.
मन एक पाखरू आहे, त्याला स्वच्छंद उडू द्या , बागडू द्या. संशयाच्या, लोकलज्जेच्या कुपीत त्याला बंदिस्त करू नका. गुदमरून मरेल ते ! आणि शिल्लक राहील ते फक्त शरीर..
तुमच्या कुटुंबा समवेत गेट टुगेदर करा. न जाणो तुमची मुलं तुमच्या मैत्रीचा वारसा पुढे चालवतील.
आपल्यातले काही मित्र मैत्रिणी इतर कारणांनी दुःखी असतील, त्यांना तुमच्यात सामाऊन घ्या.., तुमची सोबत त्यांचे विश्व बदलू शकते.
हे जग सोडताना कोणतीही इच्छा मागे ठेऊ नका कारण मनुष्य जन्म एकदा मिळतो आणि आयुष्य सुंदर आहे.
मित्रांची कदर करा आणि उरलेल्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करा व सर्व मधूर आठवणी सोबत घेउनच जगाचा निरोप घ्या.
अरे! आज मला माझ्यातला लेखक गवसला.., अर्थात क्रेडीट गोज टू रि-युनियन पटलं तर आपापल्या ग्रुप मधे नक्की अँक्टीव व्हा…
Leave a Reply