नवीन लेखन...

अस्सल मराठी जेवणातला अळू

मराठी जेवणात अळूची पातळ भाजी, वडया जितक्या लोकप्रिय आहेत तितकात दक्षिण भारतातही आहे. हवायन लोकांत अळूच्या देठाचा पदार्थ लोकप्रिय आहे. घशात खवखव होणारया अळूवर आंबट चिंच, ताक, दही वापरण्यात येते.’ टारो’ किंवा ‘एलिफंट इयर्स’ संबोधण्यात येणारा अळू व्हिटॅमिन्स आणि खनिजांनी उपयुक्त आहे.

अळू : (हिंदीत :आर्वी, काचालू; गुजराथीत: अळवी; कानडीत : श्यामी, शावे, केसु; संस्कृत : कच्वी; इंग्रजीत: तारो, अॅूरम, एलेफंट्स इयर; लॅटिनमध्ये : कोलोकेशिया अँटिकोरम; कुल-अॅनरॉइडी). ही ओषधीय वनस्पती पाणथळ जागी भारतात सर्वत्र आढळते, अळू हा शीतल, अग्निदीपन करणारा-भूक वाढविणारा, मलावरोध दूर करणारा, बलवृद्धिकर व स्तन्य (प्रसूतीनंतर मातेचे दूध वाढविणारा) आहे. अळू खाल्ल्यामुळे भरपूर चोथा मिळतो, अर्थात शौचास साफ होते. अळूच्या पानात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, ‘‘क’’, ‘‘ब’’, ‘‘अ’’, ‘‘ई’’, आणि ‘‘के’’ ही जीवनसत्त्वे, फोलेट, खनिजे व क्षार असतात.

‘व्हिटॅमिन ए’चा मुबलक साठा-

अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मुबलक प्रमाणात आढळते. सुमारे 100-200 ग्रॅम अळूमधून व्हिटॅमिन ए ची दैनंदिन गरज पूर्ण होण्यास मदत होते. अळूमध्ये 120 % ‘व्हिटॅमिन ए’ आढळते. यामुळे त्वचा सतेज होण्यास मदत होते.

• ‘व्हिटॅमिन सी’ चा पुरवठा होतो –

केवळ आंबट पदार्थांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ आढळते हा समज दूर करून अळूचा आस्वाद घ्या. कारण अळूच्या पानांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ चा सुमारे 80% साठा असतो. त्याचा फायदा जखम भरून निघण्यास होतो. तसेच हिरड्यांचे आरोग्य सुधारते.

• आयर्नची झीज भरून निघते –

रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा अॅनिमियाचा त्रास रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते.

• कॅल्शियमचा पुरवठा करते –

अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम घटक आढळतात. त्याचा फायदा हाडांची कमजोरी कमी करण्यास मदत होते. वाढत्या वयानुसार हाडांची होणारी झीज कमी होते.

• दृष्टी सुधारते –

अळूच्या पानांच्या सेवनामुळे दृष्टी सुधारायला मदत होते. तसेच डोळ्यातील शुष्कपणाच्या समस्येवर फायदेशीर ठरत मॉईश्चर सुधारते.
शरीरात वाढणारा ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस, फ्री रॅडीकल्सचा त्रास कमी करण्यास मदत करते. यामुळे अनेक घातक आजारांपासून बचाव होतो.
• अळूच्या पानांमधील आयोडीन घटक थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते.
• अळूचा आहारात समावेश कसा करावा?
अळूच्या पानांमध्ये फायबर घटक अधिक आणि कॅलरीज अत्यल्प प्रमाणात आढळतात. त्यामुळे हा अल्काईन स्वरूपाचा, थंड प्रवृत्तीचा आहे. यामुळे वजन घटवणार्यांच्या, मधूमेहींच्या आहारात फायदेशीर ठरते. अळूच्या पानांमधून केवळ फायबरचा पुरवठा होतो. परंतू त्याच्या सोबतीला डाळीचा समवेश केल्यास प्रोटीन्सचादेखील पुरवठा होतो. त्यामुळे हे एक उत्तम आणि परिपूर्ण आहार बनते. अळूवडीतही बेसनाचा समावेश असल्याने त्या अधिक रूचकर आणि आरोग्यदायी बनतात. परंतू अळूवडीचा उंडा वाफवल्यानंतर डीप फ्राय करण्याऐवजी शॅलो फ्राय करून बनवल्यास अधिक आरोग्यदायी होतो.
तसेच फोडणीला अतिप्रमाणात तीळ लावून विनाकारण फॅट्सचे प्रमाण वाढवू नका. अळूवडीप्रमाणेच त्याची पातळ भाजी बनवता येऊ शकते. यामध्ये अळूची पानं डाळीसोबत शिजवून त्याचा आहारात समावेश करा.
• अळूच्या पानांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे रक्त वाढण्यास मदत होते.
• अळूच्या कंदाचा उपयोग स्टार्च करण्यासाठी केला जातो.
• अशक्तपणा दूर करून शक्ती वाढवण्याचं काम ही भाजी करते.
• ताप आलेल्या व्यक्तीला ही भाजी खायला द्यावी. कारण तापामुळे गेलेली तोंडाची चव परत येते.
• दूध कमी येत असल्यास बाळंतिणीने आवर्जून ही भाजी खावी.
• विषारी प्राणी चावल्यास वेदना कमी करण्यासाठी अळूची पानं वाटून त्याचा चोथा त्या जागी थापावा. आणि पोटात रस घ्यावा त्यामुळे वेदना कमी होतात.
• गळू किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठं वाटून त्या जागी बांधावी. गळू फुटतात.
अळूचा आहारात समावेश करताना कोणती काळजी घ्याल ?
अळूला नैसर्गिकरित्या खाज असल्याने तो स्वच्छ आणि नीट साफ करणे आवश्यक आहे. तसेच अळू अपुरा शिजवल्यास लूज मोशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तो योग्यरित्या शिजवा. तसेच गाऊटच्या रुग्णांनी, युरिक अॅसिड अधिक प्रमाणात असलेल्यांनी अळू कमी खावा. तसेच काहींना अळूची अॅलर्जी असू शकते. त्यामुळे अळूवर ताव मारण्याआधी त्याची अॅलर्जी नाही याची खात्री करून घ्यावी.
अळूच्या पानांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारं रक्त वाढण्यास मदत होते.
अळूची पानं ही आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहेत. याचे शरिराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या काय आहेत अळूच्या पानाचे फायदे.
» मलप्रवृत्तीला आळा घालणारी असून बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी ही भाजी खाऊ नये.
» अळूच्या कंदाचा उपयोग स्टार्च करण्यासाठी केला जातो.
» अशक्तपणा दूर करून शक्ती वाढवण्याचं काम ही भाजी करते.
» ताप आलेल्या व्यक्तीला ही भाजी खायला द्यावी. कारण तापामुळे गेलेली तोंडाची चव परत येते.
» दूध कमी येत असल्यास बाळंतिणीने आवर्जून ही भाजी खावी.
» विषारी प्राणी चावल्यास वेदना कमी करण्यासाठी अळूची पानं वाटून त्याचा चोथा त्या जागी थापावा. आणि पोटात रस घ्यावा. वेदना कमी होतात.
» गळू किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठं वाटून त्या जागी बांधावी. गळू फुटतात.

१. अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात.

संकलक प्रमोद तांबे

आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..