आजकाल आपण आपल्या आजूबाजूला हेच पाहत आहोत की रोज सकाळी तयारी करून घाईगडबडीमध्ये आज लाखो लोकं ऑफिसला जात आहेत. पण ऑफिसमध्ये जाईपर्यंत सर्व ठीक असते पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांना झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो. समोर कामाचे कितीही मोठे टार्गेट असले तरीही झोप काही केल्या आवरता येत नाही. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून एक लक्षात ठेवा की असं कधीतरी झालं तर त्यामागे छोटेसे सामान्य कारण असू शकते. पण जर असं वारंवार होत असेल तर मात्र त्या गोष्टीकडे आपण तात्काळ लक्ष दिले पाहिजे आणि त्याची कारणं जाणून घेतली पाहिजेत, तर आज आपण जाणून घेऊयात यामागच्या काही कारणांबाबत…..
कमी पाणी पिणं
आपले शरीर हे ७२% पाण्याने बनलेले असून आपण नेहमीच पाण्याचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे काय आहेत ह्याविषयी कुठेनाकुठे वाचत किंवा ऐकत आलेलो आहोत. जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता व्हायला लागली तर चिडचिड आणि थकवा जाणवायला लागतो. परिणामी आपल्याला झोप येऊ शकते. यावर सर्वात चांगला पर्याय म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
झोप अपूर्ण राहणं
जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी कामावर थकवा जाणवू शकतो. याचा अनुभव आपण कधीनाकधी घेतलाच असेल. यावर सर्वात चांगला पर्याय म्हणजे रोज रात्री लवकर झोपी जाणे आणि रात्री झोपण्यापूर्वी जाणीवपूर्वक मोबाइल आणि टेलिव्हिजन पाहणे बंद करणे, असे केल्याने तुमची झोप पुर्ण होईल.
एनीमियामुळे वाढते कमजोरी
तुम्हाला येणाऱ्या झोपेचे एक कारण एनीमियाही असू शकते. जेव्हा आपल्या शरीरात आपल्या रक्तासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रेड ब्लड सेल्सची जर कमतरता जाणवू लागली तर अशावेळेस एनीमियाची लक्षणं दिसू लागतात. ह्या सेल्सचे मुख्य काम म्हणजे आपल्या फुफुस्सांमार्फत शरीरात ऑक्सिजन पोहचवणे. एनीमिया आयर्न किंवा व्हिटॅंमिनच्या कमतरतेमुळे होतो.
डिप्रेशनमुळे उडते झोप
जर तुम्ही सतत डिप्रेशनमध्ये असाल तर ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी धोक्याची घंटा आहे आणि म्हणूनच ह्या गोष्टीची काळजी करणं अतंत्य गरजेचे आहे. यामुळे सर्वप्रथम तुम्ही स्वतःला कमजोर समजू लागता. याच डिप्रशनमुळे तुम्हाला पूर्णवेळ झोप न लागता सतत थकवा जाणवत राहतो. परिणामी अशी व्यक्ती सतत थकलेली आणि कमजोर दिसायला लागते.
— संकेत रमेश प्रसादे
Leave a Reply