विद्रोही कवी तुळसी परब यांचा जन्म १९४१ सालात झाला.
मराठी आणि भाषाशास्त्र विषयात ‘एम. ए.’केलेल्या परब यांनी काही वर्षे मंत्रालयातही नोकरी केली होती. साठोत्तरी पिढीतील ज्या मराठी कवींनी मराठी वाङ्मयाला वेगळे वळण दिले, त्यात तुळसी परब हे प्रमुख होते. ‘हिल्लोळ’, ‘धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्या मधल्या कविता’, ‘कुबडा नार्सिसस’आणि ‘हृद’ हे त्यांचे चार कविता संग्रह आहेत. त्यांनी जागतिक ख्यातीचे कवी पाब्लो नेरुदा यांच्या कवितांचेही अनुवाद केले होते. ‘पाब्लो नेरुदांच्या कविता’,‘मनोहर ओक यांच्या ऐंशी कविता’ ही परब यांनी संपादित केलेली पुस्तके आहेत.
सत्तरीच्या दशकात शहाद्यात झालेल्या आदिवासी, शेतमजुरांच्या जनआंदोलनात तुळसी परब आपली मुंबईतील शासकीय नोकरी सोडून सहभागी झाले होते. ते साम्यवादी विचारसरणीचे, श्रमिक या संघटनेचे कार्यकर्ते होते. २००४ साली नवी मुंबईतील विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
तुळसी परब यांचे ५ जुलै रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply