हिला कुठेतरी पाहिले आहे
लक्षात नाही आले
मी लांबूनच तिला बघत होतोबघत बघत
जवळ येऊ लागलो
ती म्हणाली पहेचाना
मी असेच उत्तर दिले
कैसी होआप.
बस वापीस यहा आ गयी इधर धंदा
फिरसे शुरु किया
१० साल के बाद आयी
आणि माझी ट्यूब पेटली
ती इथेच ठाणा स्टेशनवर धंदा
करत होती
पूर्वी मी अशा काही मुलींची मुलाखत
एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रात मुलखात घेतली होती
मला तिचे नाव आठवत नवहते
मै रेश्मा
मला आठवले
आजूबाजूचे जाणारे येणारे माझ्याकडे बघत होते,
त्यांना वाटले गिऱ्हाईक आहे.
शेवटी तीच म्हणाली सामनेवाले होटल मी जायगे
मला लोकांची पर्वा नव्हती ,
चल म्हणत मीही एका छोट्या हॉटेल मध्ये शिरलो
काउंटर वरच्याने दुर्लक्ष केले,
त्याला बहुतेक सवय होती
वडा-साबार मागवला
तू वापीस आई
हा करू क्या
छोकरा था शादी करके चला गया
गाव पे मेरा घर है
इधर कमाया
उधर एकदम साफ थी
बच्चा बडा हो गया
बस उसने खुद का देख लिया
मई उधर एकदम साफ थी
इकभि मरद को छूने नाही दिया
तिचे उच्चार वेगळे होते
फिर इधर क्यू आया
मई दो महिने के लिये आयी हू
जरा मजा करुंगी और जाऊंगी
जाते जाते कमाउगी
तिची ही फिलॉसॉफी मला कळाली नाही
मी तिला विचारले
ती टाळंटाळ करत होती
तिचा पत्ता लागत नवहता
तरी पण विचारले
तेव्हा ती म्हणाली
दस साल ड्वाई खा के जी रही हू
बहुत सह लिया
अब जिने का नाही.
बस मेरी बेमारी मै यहा बाटना चाहती हू
यहींच मुझे मिली थी
माझ्या अंगाचा थरकाप उडाला
मी खूप समजावले
तशी ती रडू लागली
जाता जाता म्हणाली सोचूगी
तीन चार दिवसात
प्लँटफॉर्मवर गर्दी दिसली
पोलीस दिसले
गर्दीत बघीतले तर स्ट्रेचरवर ती होती
मेलेली
काय झाले मी विचारले
काय झाले
धंदेवाले होती
गाडीखाली उडी घेतली
माझे पायच लटपटले
त्याच लटपट्या पायाने
समोरच्या बारमध्ये घुसलो
स्वतःला विसरण्यासाठी.
बाहेर आल्यावर समजले
सर्व शांत झाले
सर्व व्यवहार सुरु झाले होते
घटना घडून चार पाच
वर्षे झाली असतील
फक्त मला एकच चिंता
सतावत आहे
कोरोनंतर मात्र खूप
गणिते बदलणार निश्चित
ग्रॅन्टरोडचा रेड लाईट मंदावणार नाही मंदावला हे निश्चित ?
परंतु हा रेड लाईट गल्लीबोळात
घुसणार हे निश्चित
शेवटी प्रत्येकाला पोट आहे हे
निश्चित
नीतिमत्तेच्या गप्पा फक्त
भरल्या पोटीच मारता येतात
तीच मला मागे हेच
म्हणाली होती ?
— सतीश चाफेकर.
Leave a Reply