सध्या सर्वत्र सोशल मेडियाचा धुमाकुळ आहे. त्यातल्या त्यात व्हॉटस एप चा बोलबाला आहे.
सोशल मेडियाने सर्वांना एकत्र आणण्याचे काम उत्तम रित्या केले आहे, म्हणतात सोशल मेडियामुळे जग जवळ आले आहे. हे काही अंशी खरे ही आहे, मात्र चांगल्या फायेदेशीर बाबींचा गैरवापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हॉट्सएप आहे.
* या व्हॉट्सएप मुळे लोकांची क्रय शक्ती कमी झाली.
* काम-व्यवसाय सोडून सर्व जण दिवसातील आपला बहूमोल वेळ व्हॉटसएप चाटींग मध्ये खर्ची घालतात.
* लोकांना व्हॉट्सएप चे व्यसन लागले आहे.
* तंबाखू – दारू पेक्षाही हे व्हॉट्सएप चे व्यसन जास्त घातक आहे.
* या व्हॉट्सएप मुळे मनाची बेचैनी वाढली आहे.
* या व्हॉट्सएप मुळे अस्वस्थपणा वाढला आहे.
* एक – दोन तास जरी व्हॉटस एप सुरु नसेल तर मनाची घालमेल व्हायला सुरुवात होते.
* जेवणाच्या ताटावर – शौचालयाच्या कमोड वर – गाडी चालविताना – एका हातात अभ्यासाचे पुस्तक दुसरया हातात व्हॉटसएप वापरणारे महाभाग आपणास सर्वत्र दिसतील.
* कुठेही जा, कोणत्याही दुकानात-ऑफिसमध्ये जा लोक या व्हॉट्सएप वरच दिसतील.
* चार – चौघे एकत्र बसून गप्पा मारण्याचे दिवस दुर्मीळ झाले आहेत, चार- चौघे एकत्र असतील तर चौघांच्या ही हातात व्हॉट्सएप दिसेल.
* त्या व्हॉटसएप मुळे अतिरिक्त काम करायला कंटाळा यायला लागला आहे, जागेवरून उठणे नकोसे वाटायला लागले आहे.
* रात्री उठून सुध्दा बेचैनीमुळे लोक व्हॉट्सएप चेक करतात.
* हा व्हॉट्सएप म्हणजे प्रत्येक आई-बापाच्या जीवाला ताप झाला आहे, मुलं-मुली अभ्यास न करता तासन् तास लपून छपून व्हॉट्सएप वर चाट करत असतात.
* या व्हॉटसएप वर सर्व जातीचे- धर्माचे वेगवेगळे ग्रुप तयार झालेले आहेत, त्या ग्रुप मध्ये जातीयता-कट्टरता वाढविण्याचे छुपे संदेश दिले जातात. अश्लिल चाटिंग चे, होदौस, भडास सारखे ग्रुप तयार झाले आहेत.
* आजीबाईच्या बटव्यासारख्या विविध ग्रुप वर गुळ खा मधुमेह कमी होते असे मेसेज फिरतात. तेथे सर्वजण डॉक्टर झालेले असतात, माझ्या मुलाला खुप जुलाब होत आहेत काय उपाय करु असे प्रश्न असतात.
* रिकाम्या व हौसी लोकांनी विविध ग्रुप बनवून त्यात लोकांना अडकवून ठेवण्याचे काम सुरु आहे.
* परिस्थिती अशी झाली की एका ग्रुप मधून बाहेर पडा – लगेच कोणी तरी दुसरया गूप मध्ये एड करते. समाजात ज्याचे नाव आहे, ज्यांच्या भरपूर ओळखी आहेत, ज्यांचा मोबाईल नंबर सर्वत्र गेला आहे, त्यांना तर व्हॉटसएप चा काहीही फायदा होत नाही, तासाला हजारच्या वर मेसेज येतात. शक्य आहे का हे मेसेज वाचणे ??
* सतत व्हॉट्सएप वापरल्यामुले मेंदू मध्ये बधीरता यायला लागली आहे.
* सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे मोबाईल च्या सुक्ष्म लहरीमुळे मेंदूंमध्ये मुंग्या येत आहेत की काय असे जाणवायला लागले आहे. डोके गरगरल्या प्रमाणे वाटणे-डोके जड वाटणे असे व्हायला लागले आहे.
* झोप कमी व्ह्यायला लागली आहे.
* सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे मोबाईल च्या सुक्ष्म लहरीमुळे डोळ्यांना अपरिमित हानी होत आहे, डोळ्यामध्ये आग होणे, डोळे जळजळ करणे, डोळ्यांना कमी दिसने असे प्रकार सर्रास दिसून येत आहेत.
सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे कित्येकांमध्ये एकाकीपणा यायला लागला आहे.
*वरील सर्व मुद्दे सत्य आहेत-यात कोठेही अतिशयोक्ति नाही, मी व्यवसायाने डॉक्टर आहे, माझे कडे मागील ४-५ महिन्यात आलेल्या शेकडो रुग्णांना चौकशी करुन ही सर्व माहीती संकलित केली आहे, तुम्ही स्वता व्हॉटस एप वापरत असाल तर व्हॉतसएप पासून दुर रहा, व्हॉट्सएप चा एक टक्का फायदा आहे तर ९९ टक्के नुकसान आहे*
— डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
लातूर (महाराष्ट्र)
मो. ०९३२६५११६८१
माहीती आवडली असेल तर लेखकांचे नाव न कापता ती इतरांना पाठवून त्यांना व्हॉटसएपच्या भयंकर दुष्परीणामाची माहीती द्या
nice …
अगदी बरोबर. पण कोणी ऐकेल असें मात्र नाहीं. महर्षि व्यासांनाहीं, ‘ऊर्ध्व बाहो…’, ‘मी ओरडतो आहे पण कोणीही ऐकत नाहीं’, असें म्हणायची पाळी आली होती, यातच काय तें आलें ! अर्थात्, प्रयत्न हा कोणीतरी करायलाच हवा, तो अगदी अरण्यरूदन ठरला तरी ! त्याबद्दल अभिनंदन.
सुभाष स. नाईक, मुंबई