रेशमाच्या लडीसारखे, नात्याचे पदर,
प्रत्येक नात्याचा वेगळा आदर
आईच्या गर्भात नात्याची रुजवात,
जन्माला आल्यावर गुंफायला सुरुवात
भावनांच्या धाग्यात गुंफली जातात नाती,
नात्यांच्या गोफात, ऋणानुबंधाच्या गाठी
आयुष्याच्या प्रत्येक, वळणावर एकेक
नात नव जुळत असतं,
जन्मभराच्या प्रवासात, ते आपली सोबत करतं
म्हणून तळहाताच्या फोडासारख,
जपाव लागत नात,
अन् कळीसारख अलवार,
फुलवाव ते लागत
नात्यामध्ये श्रेष्ठ, माणूसकीच नातं,
गरीब- श्रीमंत, जात-धर्म, बंधन त्याला नसतं
सरणावरती जळतो,
तरी जळत नसत नातं,
नावासारख मागे उरत
तेच खर नातं, तेच खर नातं
— सौ. अलका वढावकर
नातं माणूसकीच……….
जगात अनेक प्रकारची नाती आहेत , पण माणूसकीच घट्ट असं नातं कुठही पहायला मिळतं नाही , लोकांना माणूसकी आहे , पण त्याच नातं नाही , रक्ताची नाती आहेत, पण त्यांना माणूसकी नाही असच पहायला मिळतय , आजच्या नात्यात दुरावा वाढत चाललाय , का कुणास ठाऊक माणसं या विन्याणवादी युगात नवे शोध लावत निर्जिव बनत चालली आहे , माणसांना माणसाबद्दलची अपुलकी , प्रेम , जिव्हाळा हा राहिलाच नाही असंच वाटतं , नाती ही फक्त नातीच राहिली , त्यांना जो टिकाऊपणा पाहिजे होता तो मिळालाच नाही , आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नात्याला खुप महत्व आहे , माणूसकीच नातं माणसाला स्व:ताची ओळख करुन देतं , माणूसकी , नाती गोती ही असायलाच हवी , दूर दूर गेलेली नाती पुन्हा जुळून येवो , राग ,रूसवा ,दुरावा सारं विसरून नव्या युगाला आरंभ करू , आयुष्य थोडं जगू पण सुदंर जगू , हेच सारं नाती शिकवून जातात . आम्ही माणूसकीच्या नात्याला जोडत जातो , तुम्ही त्या नात्याचा गोतावळा बना .
आम्ही नाती जोडतो , जग अापुआप जोडलं जाईल …..
– र.दि.तोत्रे