नवीन लेखन...

धर्म आणि दहशतवाद…

Religion and Terrorism

दहशतवादी हल्ल्यात अमुक अमुक देशात तमुक तमुक माणसे मरली गेली या अशा आशयाच्या बातम्या आता नित्याच्या झालेल्या आहेत. आपल्या मराठीत म्ह्णच आहे ना ‘रोज मरे त्याला कोण रडे’ तसेच काहीसे या दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत झालेले आहे. फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकही आता या बाबतीत उदासिन झालेले असावेत. सध्याच्या युगातील माणसे मला वाटत आपला जीव तळहातावर घेऊनच जीवन जगत असतात. त्यांचा जीव त्यांच्या तळहातावरून बर्फाच्या गोळ्यासारखा कधीही गळून पडेल याची जणू त्यांना खात्रीच असते. असं तळहातावर जीव घेऊन जीवन जगणारेच आज खर्याग अर्थाने जीवन जगत असतात असं म्हटलं तर ती अतिशोक्ती ठरणार नाही. आज ना उद्या मरायचेच आहे मग आज मेलो तरी काय फरक पडणार आहे ? हा विचार अगदी सहज करण्याइतपत आजचा माणूस येऊन पोहचलेला आहे. आपण कोणासाठी तरी जगायला हवं अथवा आपल्या जगण्यावर कोणीतरी अवलंबून आहे आपल्या जगण्याची जगाला गरज आहे असं आत्मविश्वासाने मानणारा माणूस आता या भूतळावर जीवंत असण्याची शक्यता आता जवळ – जवळ धुसरच आहे.

माणसाने कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसते त्यामुळे तो ज्या धर्मात जन्माला आला तो धर्म स्वीकारण्याखेरीज त्याच्याकडे पर्याय नसतो. ज्यावेळी रामायण महाभारत घडले त्यावेळी आजच्या प्रचलित विशिष्ठ अशा कोणत्याही धर्माचा उल्लेख आढळत नाही. पण संस्कृतीचा उल्लेख आढळतो. त्यावेळी माणसातील भेद दोनच प्रकारे केला जायचा एक सत्याची बाजू घेणारा आणि दुसरा असत्याची बाजू घेणारा. सत्याची बाजू घेणारा तो धार्मिक आणि असत्याची बाजू घेणारा तो अधर्मी रामायणात राम धार्मिक तर रावण अधर्मी होता. महाभारतात पांडव धार्मिक तर कौरव अधर्मी होते. गीतेत म्हटल्या प्रमाणे शेवटी धर्माचाच विजय होतो. पण त्यावेळी श्रीकृष्णांना अपेक्षीत असणारा धर्म आज अस्तित्वात आहे का ? हा संशोधनाचा विषय आहे. आज धर्माची परिभाषा भयंकर बदलेली आहे. हिंदू संस्कृती ही जागतिक होती, संपूर्ण जगासाठी होती या संस्कृतीमुळेच निसर्ग सांतुलीत होता. कालांतराने अधर्मामुळे संस्कृतीत भेसळ वाढत गेली आणि संस्कृती बदलत तिला धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. एखाद्या प्रदेशाचे भौगोलिक वातावरण त्या प्रदेशात राहणार्यात लोकांची भाषा आणि त्यांच्या भौगोलिक गरजा याला पुरक म्ह्णून तिथे राहणार्याा लोकांनी आपल्या संस्कृतीत काही बदल करत गेले आणि ते बदल वाढत गेल्यावर एका नवीन धर्माचा जन्म झाला.

आज जगभरात जो दहशतवाद पसरविला जातोय तो फक्त धर्माच्या नावावर. धर्म आणि दहशतवाद यांचा संबंध इतका जवळ्चा आहे की एखादया लहान मुलाला जरी विचारलं की दहशतवादाच्या मुळाशी काय आहे ? तर तो अगदी सहज म्ह्णेल धर्म ! दहशत म्ह्णजे काय भितीचे वातावरण तयार करून लोकांच्या मनात भय निर्माण करणे, त्यांना निर्भय होऊ न देणे गीतेत म्ह्टल्या प्रमाणे जोपर्यंत माणूस निर्भय होत नाही तोपर्यंत तो काहीही साध्य करू शकत नाही. निर्भय माणसाला जिंकणे अशक्य असते. त्यामुळे जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारे दहशत ही एखादया शस्त्राप्रमाणे वापरतात. जे कधी – कधी शस्त्रानेही साध्य होत नाही ते दहशतीने साध्य करता येते. मुंबईसारख्या शहरात अगदी किरकोळ शरीर असणारे तरुण फक्त हातात एक सुरा घेऊन रस्त्यावर फिरतात आणि शेकडो लोकांना त्यांच्या दहशतीच्या सावटाखाली जगायला भाग पाडतात. पण त्या शेकडो लोकांपैकी एक जरी निर्भय असेल तर तो या गुंडाना अगदी सहज पाणी पाजू शकतो पण दुदैवाने तसे क्वचित होते. मुंबईसारख्या शहरांवर दहशदवादी हल्ले होतात ते काही लोकांना फक्त ठार मारण्यासाठी होत नाहीत हे करणार्यांानाही माहित असते करोडो लोकांमधील पाच पन्नास लोक मेल्याने काहीही फरक पडत नाही. पण त्या पन्नास माणसांना मारून ते पन्नास करोड लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यात यशस्वी होतात. त्या दहशतीच्या जोरावर पुढे कित्येक वर्षे ते त्या लोकांवर राज्य करतात.

आज दहशत निर्माण करण्यासाठी धर्माचाच आधार का घेतला जातो ? खरं तर दहशतवादाला कोणताही जात-धर्म अथवा रंग नसतो पण दहशतवादाची बंदूक चालविण्यासाठी एक खांदा लागतो तो खांदा म्ह्णजे हल्ली धर्म असतो. एका धर्माच्या दहशतीखाली दुसरा धर्म वावरत असतो. भारतापासून पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण झाला फक्त धर्माच्या नावावर एक स्वतःला हिंदू तर दुसरा स्वतःला मुस्लिम राष्ट्र म्ह्णवून घेतो आणि उगाच एकमेकांच्या दहशतीच्या सावटाखाली विनाकारण दिवस ढकळत आहेत. काही मुस्लिम राष्ट्रे ख्रिश्चन राष्ट्रांच्या दहशतीखाली दिवस ढकळत आहेत. फक्त जैन आणि बौद्ध धर्माचे कोणाला भय वाटत नाही पण त्या धर्मातील लोकांना दहशतवादाचा सामना करावाच लागतो. या अहिंसावादी धर्मांमुळेच जगात हिंसक अधर्माचे प्राबल्य वाढले त्यांना आवर घालण्यासाठी धर्माच्या रक्षणासाठी हिंसा मान्य असणार्यार हिंदू धर्मामुळेच अहिंसा मानणारे हे धर्म टिकले नाहीतर ते ही नष्ट झाले असते आणि सार्याय जगावर अधर्माचे राज्य असते हे सत्य नाकारता येणार नाही. धर्माच्या रक्षणासाठी हिंसा मान्य असणार्या याच हिंदू धर्मात जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूचे नव्हे तर न्यायाचे राज्य प्रस्थापित केले नाहीतर आज हिंदूस्तानात हिंदू शोधावा लागला असता. हिंदूनी आपला धर्म वाढविण्याची महत्वकांक्षा कधीच बाळगली नाही त्यामुळे सर्वाधिक अघात हिंदू धर्मावरच झाले आहेत हे सत्य नाकारता येणार नाही. त्यामुळे हिंदू धर्माची कोणालाच कधीच दहशत वाटली नाही. पण मुस्लिम राज्यकर्त्यांनी मुस्लिम धर्माची दहशत संपूर्ण जगात पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यात ख्रिश्चन धर्मिय ही मागे नाहीत आजही भारतात गरीब हिंदूंना पैशाची लालच दाखवून त्यांना आपल्या धर्मात आणण्याचे प्रकार अधूनमधून उजेडात येत असतात. जगात अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना आपला धर्म कोणता आहे हेच माहित नाही या अशा लोकांना आपल्या धर्माचे मांडलीक करून आपल्या धर्माची दहशत जगभरात पसरविण्याचा छुपा प्रयत्न केला जातो. फक्त धर्म कुरवाळत बसलेल्या लोकांची प्रगती खुंटते पण त्यांना जगातील सारी भौतिक सुखे मात्र मिळवायची असतात ती मिळविण्यासाठी ही लोक दहशतवादाचा मार्ग स्वीकारतात आणि त्यासाठी कधी – कधी ते आपल्याच धर्म बांधवांचा बळी घ्यायलाही कचरत नाहीत.

आता तर दहशतवादी धर्माच्याही पलिकडे गेलेले आहेत आता त्यांना दहशतवाद हाच त्यांना त्यांचा धर्म वाटू लागलेला आहे पण हीच त्यांच्या विनाशाची घंटा आहे कारण आजपर्यंत धर्मच त्यांचा रक्षणकर्ता होता, कारण दहशतवाद्यांना माहित नाही की धर्म हाच या विश्वातील सर्वात मोठा दहशतवादी आहे. एक धर्म फक्त दुसर्यान धर्मातील लोकांवर दहशत ठेवण्यास तत्पर नसतो तर तो त्याच्याच धर्मातील लोकांवर दहशत ठेवत असतो. हिंदू धर्मातील लोकांच्या मनात देवाविषयी , पाप- पुण्या विषयी दहशत असते, आपल्या परंपरा जपण्याची त्या टिकवून ठेवण्याची दहशत असते. कित्येक धर्मात स्त्रियांनी कस वागावं याची दहशत असते. कित्येक धर्मांच्या प्रमुखांवर आपला धर्म जीवंत ठेवण्यासाठीची दहशत असते. प्रत्येक धर्म ज्या ईश्वराला मानतो त्या ईश्वराच्या दहशतीखाली त्या – त्या धर्मातील लोकांना ठेवण्याचा प्रत्येक धर्माचा प्रयत्न असतो. इंग्रजांनी आपल्या देशावर जवळ – जवळ दोनशे वर्षे राज्य केले पण त्यांनी आपल्या देशातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या नाहीत नाहीतर त्यांना आपल्या देशावर दोन दिवस राज्य करणेही शक्य झाले नसते. आजही भले-भले धर्मावर भाष्य करताना हजारदा विचार करतात. आजचे राजकारणीही धर्माच्या दहशतीखाली राहूनच राज्य करीत आहे हे सत्य आहे. धर्म आणि दहशतवाद हे हातात हात घालून चालता आहेत. जोपर्यत धर्म आहे तोपर्यंत दहशतवाद असणारच धर्माच्या दहशतीत राहण वेगळ आणि त्या दहशतीचा आपल्या स्वार्थासाठी वापर करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज धर्माच्या दहशतीचा काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी वापर करीत आहेत पण त्यांना माहित नाही धर्माची दहशत इतकी भयंकर आहे की ती त्यांना कधी गिळंकृत करेल त्यांचे त्यांनाही कळणार नाही…

लेखक – निलेश बामणे
गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375

Avatar
About निलेश बामणे 418 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

1 Comment on धर्म आणि दहशतवाद…

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..