नवीन लेखन...

वाढत्या वजनावर योग्य उपाय

वजन कमी करणं हे प्रत्येकासाठी एक चॅलेंज बनलं आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. हल्ली वजन कमी करण्यासाठी लोक नानाविध प्रकारे प्रयत्न करतात. गोड पदार्थ खाणं टाळणं, नवनवीन डाएट प्लॅनचा अवलंब करणं, ट्रेडमिल वर धावून घाम गाळणं, यांसारखे असंख्य प्रयत्न वजन कमी करण्यासाठी केले जातात; पण वजन काही केल्या कमी होत नाही. विविध प्रकारच्या व्याधी दूर ठेवण्यासाठी प्रमाणबद्ध शरीर ठेवणे गरजेचे असते. वजन आटोक्यात ठेवले तर व्याधी आपसूक दूर राहतात. जीवनशैलीच्या बदलत्या काळात वजनावर नियंत्रण ठेवणे हे व्यायामाच्या मदतीने शक्य आहे.
Image result for weight loss
अनेकदा लोक आपल्या वाढलेल्या वजनामुळे चिंतेत असतात. खासकरून महिलांमध्ये काही असे हार्मोन्स असतात. जे वजन कमी करत नाहीत तर वाढवतात. अशावेळी यापासून सुटका करण्यासाठी काही व्यक्ती बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेतात. पण तरिदेखील वजन कमी होत नाही. ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस, सांधेदुखी, स्पॉन्डीलायटीस यासारख्या आजारांमध्ये महत्वाचे कारण म्हणजे गरजेपेक्षा वजन अधिक असणे. वजन योग्य तेवढे राखता येण्यासाठी ज्या प्रकारची जीवनशैली आवश्यक असते, त्याद्वारे अनेक आजारांचा सहजच प्रतिबंध करता येतो.
वजन कमी करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय
स्नायू बळकट करा
व्यायामात रेझिस्टन्स ट्रेनिंगचा समावेश करावा; कारण या पद्धतीमुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते. डम बेल्स, डायना बँड्स किंवा व्यायाम करण्यासाठीच्या मशिन्सचा उपयोग करून वजन उचलण्याचा प्रयत्न केल्यास चयापचयच नव्हे तर शक्ती वाढते आणि शरीरयष्टी दोन्ही सुधारण्यास मदत होते.
व्यायामाचा समावेश
आठवड्यातून एकदा चालणं, धावणं, पोहणं यांसारखे अॅरोबिक व्यायाम किमान अर्धा तास करा. अॅरोबिक व्यायाम केल्यामुळे चयापचय क्षमतेचा वेग सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढतो. या पद्धतीच्या व्यायामामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि चरबी (फॅट्स) कमी होण्यास मदत होते. व्यायामामुळे स्नायूंची शक्ती, चिकाटी, लवचिकता वाढते. शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते, शरीराच्या चयापचयाच्या गतीमध्ये सुधारणा होते. शरीर बांधेसूद होते. एरोबिक्समुळे स्टॅमिना वाढतो, हृदयाचे स्नायू शक्तिमान होतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, चिंता, निराशा, लठ्ठपणा या सर्व विकारांच्या उपचारामध्ये एरोबिक्सच्या व्यायामांचा फायदा होतो. कोलेस्टेरॉल नियंत्रित होते.
संतुलित आहार
वजन वाढण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे, जेवण्याच्या वेळा न पाळणं आणि भूक नसतानाही खाणं. जर आपण हे सर्व कंट्रोल करू शकलो, तर काही प्रमाणात वजन कमी करण्यासाठी मदत होते. तुम्ही वारंवार डाएट प्लॅन तयार करता आणि अचानक काही काळानं सोडून देत असाल, तर ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. असं केल्यानं तुमचं कमी झालेलं वजन पुन्हा वाढतं. बऱ्याचदा वजन कमी करायचं, म्हणून तुम्ही तुमचं पोट खूप वेळ रिकामं ठेवता, तेव्हा तुमच्या शरीरात कॅलरीज तशाच राखून ठेवल्या जातात. ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते. यापेक्षा वेळेवर संतुलित आहार घेणं शरीराला फायदेशीर ठरतं. मुलांमध्ये वजन वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे हल्ली फास्ट फूडचा अतिरेक, टीव्हीसमोर बसून घेतलेल्या जेवणाला काही प्रमाण राहत नाही, त्यात मुले किती खातात हे खुद्द मुलांच्याच लक्षात येत नाही, या जंकफूडचा मारा होऊन लहानपणापासूनच मुलांमध्ये चरबी साठत जाते.
कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
Sanket
Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..