नवीन लेखन...

संगणकातल्या पसार्‍याची आवराआवर

Remove unwanted files from your PC

हे नवीनच शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं? खरं आहे. संगणकावर काही पसारा असू शकतो याचं भानच आपल्याला बर्याचदा नसतं. एकदा का संगणक घरी आला की त्याच्यावर पाहिजे तेवढी माहिती ठेवायची आपल्याला घाई होते. कधीतरी-कुठेतरी, कोणाकडून ऐकलेले शेकडो प्रोग्रॅम्स – बहुधा ज्याच्याकडून संगणक घेतलाय त्याच्याकडूनच – आपल्या संगणकावर घालून घेतले जातात. यात आपल्या गरजेचे किती आणि अनावश्यक किती याचा आपण विचारच करत नाही.

सध्याच्या संगणकात भरपूर मोठी हार्डडिस्क असते. त्यामुळे ठेवा काहीही… जागा तर भरपूर आहे याकडेच सगळ्यांचा कल असतो. घरी संगणक घेणार्यांपैकी ५० टक्के लोक त्याचा वापर इंटरनेट, इ-मेल, गेम्स आणि सर्वसाधारण स्वरुपाचा पत्रव्यवहार यासाठीच करतात. मात्र अशा लोकांच्या संगणकाच्या हार्डडिस्कमध्ये डोकावून पाहिले तर काय दिसते? कोणाकडे पेजमेकर, कोणाकडे कोरलड्राॅ, कोणाकडे एमएस ऑफिस २००७….. कुटे गेम्स तर कुठे गाणी, सिनेमा आणि इतर बरंच काही. याचा खरोखर उपयोग किती होतो आणि किती नाही हा प्रश्नच आहे. आपण काय काम करणार आहोत आणि त्यासाठी कोणत्या प्रोग्रॅम्सची गरज आहे याचं भान ज्याने-त्याने ठेवायलाच पाहिजे. संगणकावरच्या जागेचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेच खरंतर दुर्लक्षिलं जातं हे मात्र तितकंच खरं.

थोडं आपल्या घराकडे वळून बघुया आणि मग आपल्याला जागेच्या व्यवस्थापनाचा अंदाज येईल. आपल्या घरात कितीही जागा असेल तीसुद्धा आपल्याला कमीच वाटते. एखादी खोली आणखी असती तर किती बरे झाले असते असं आपल्याला वाटतंच ना? आणि जास्त जागा नसली तरीही आपण आपलं सामान कमी करण्याच्या ऐवजी वाढवतंच असतो. पण एक दिवस असा येतो की असं सामान साठवायची आपल्या घराची क्षमताच संपते आणि आपल्याला नाईलाजानं का होईना, काही सामान काढावंच लागतं.

संगणकावरच्या जागेचंपण असंच आहे. कितीही जागा असली तरीही कमीच वाटते. अगदी २ हार्डडिस्क लावल्या तरीही कमीच. पण शेवटी प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा आहेतच ना? त्यामुळे दुसरीही हार्डडिस्क भरली की मग काय? तेव्हा संगणकावरच्या जागेचं व्यवस्थापन सुरुवातीपासूनच केलं तर ऐनवेळी जागा नाही त्यामुळे काम करता येणार नाही अशी परिस्थितीच येणार नाही. संगणकावरच्या जागेचं हे व्यवस्थापन कसं करायचं ते पाहू.

बर्याचदा एखाद्या सॉफ्टवेअरचे नवे व्हर्जन आले की आपल्याला ते वापरण्याचा मोह होतो. त्याचा आपल्याला उपयोग किती हा भाग वेगळाच, उदाहरण द्यायचे तर एमएस ऑफिसचे बघुया. गेल्या दोन-तीन वर्षात एमएस ऑफिसची नवनवी व्हर्जन्स बाजारात आली. यातील सर्वात आधुनिक म्हणजे ऑफिस २०१०. हे व्हर्जन अत्याधुनिक सुविधा आपल्याला देते हे मान्य, पण या सुविधा आपण वापरणार आहोत का हेसुद्धा पहाणे महत्त्वाचे आहे. एमएस ऑफिस २००७ हे सामान्य काम करण्यासाठी इतके क्लिष्ट आहे की विचारायची सोय नाही. सर्व मेनूज बदलल्यामुळे आपल्या सवयीचे स्क्रीन दिसत नाहीत. सामान्य माणूस गोंधळून जातो. अशावेळी एमएस ऑफिस २००३ किंवा ऑफिस एक्सपी वापरणे केव्हाही चांगले. एमएस ऑफिसला बाजारात आलेला नवा पर्याय म्हणजे ओपन ऑफिस हा मोफत उपलब्ध असलेला ऑफिस सूट. हासुद्धा वापरुन बघायला हरकत नाही.

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..