प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक विजय गोखले यांचा जन्म २३ सप्टेंबर रोजी झाला.
विजय गोखले हे ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांचे चिरंजीव. विजय गोखले यांनी दूरदर्शनवरील “श्रीमान श्रीमती” ही हिंदी विनोदी मालिका गाजवली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले.
सालीने केला घोटाळा, ही पोरगी कोणाची, पोलिसाची बायको यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. दम असेल तर, भरत आला परत या चित्रपटात त्यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
विजय गोखले यांची पत्नी सविता गोखले आणि मुलगी श्रद्धा गोखले दोघीही डेंटिस्ट असून आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत, व चिरंजीव आशुतोष गोखले हे अभिनेते असून ते ‘तुला पाहते रे’ या मालिकेत काम करत आहेत.
‘दम असेल तर’ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा आशुतोष याला देखील अभिनयाची संधी दिली होती. अभिनेता अद्वैत दादरकर हा विजय गोखले यांचा भाचा आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply