बिशन सिंग बेदी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ रोजी पंजाब मधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील उत्तम खेळाडू होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला खेळासाठी नेहमी प्रोत्सहानच दिले. लहानपणेच बेदीना आवड निर्माण झाली ती फ़ुटबाँलची. बिशनसिंग बेदी हे पंजाब विद्यापीठाचे पदवीधर आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी ते नॉर्थन पंजाब कडून खेळले होते. १९६८-६९ मध्ये ते दिल्लीला गेले. बिशनसिंग बेदी जेथे जातील तेथे लोकप्रिय होत असत. शेष विश्वसंघातर्फे १९७-७२ च्या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियाला गेले असता तेथे त्यांच्याबद्दल कुतूहल आणि आकर्षण निर्माण झाले होते. तेथील महिलांच्या मासिकांमध्ये त्यांच्या मुलाखती छापून आल्या होत्या. अशा मुलाखती छापून येण्याचा मान त्यावेळी एलिझाबेद टेलर, जॅकी ऑनेसिस आणि सोनिया मॅकमोहन अशा मोजक्याच मंडळींना मिळालेला होता. त्यांना सहज एकाने विचारले तुम्हाला बघायला लोक का येतात तेव्हा ते हसून म्हणाले होते कदाचित त्यांच्यापेक्षा मी वेगळा दिसत असेन.
बिशनसिग बेदी हे डावखुरे मंदगती गोलंदाज होते आणि त्यांची गोलंदाजीची पद्धत अत्यंत साधी आणि ओघवती होती. त्यांच्या ह्या गोलंदाजीमुळे अनेकांना जखडून टाकले होते आणि गोधळून टाकले होते. तसे पाहिले तर त्याच्या हातची बोटे लांबसडक आणि जाडजूडही नव्हती. तरीही फिरकी गोलंदाजी करताना त्याच्या बोटाना कधी त्रास झालेला नव्हता. बिशनसिंग बेदी म्हणतात त्याचा आदर्श खेळाडू होते सुभाष गुप्ते आणि डावखुरे विनू मंकड. या दोघांची गोलंदाजी बघून बिशनसिंग बेदी यांना मंदगती गोलंदाज व्हावेसे वाटले. १९६६ च्या डिसेंबर महिन्यामध्ये दिल्लीला ‘ प्राइम मिनिस्टर ‘ चा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत असताना बिशनसिंग बेदी यांनी १३० धावांमध्ये वेस्ट इंडिजच्या ६ विकेट्स घेतल्या. त्यावेळी निवड समितीचे सभासद दत्त रे आणि माधव मंत्री तो सामना पहात होते. माधव मंत्री आणि दत्ता रे त्यांचे एकमत झाले की बिशनसिंग बेदीना संधी द्यायची तेव्हा त्यांनी सामना संपल्यानंतर बिशनसिंग बेदी यांना त्यांचे सामान आवरायला सांगितले आणि कोलकत्यामध्ये जाण्यास सांगितले कारण कोलकत्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामना होता. बिशनसिंगबेदी पहिला कसोटी सामना ३१ डिसेंबर १९६६ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकत्यामध्ये खेळले.
त्यानंतर पुढे १९६९ मध्ये कोलकत्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्याआधी बिशनसिंग बेदी यांनी दोन दिवस अगोदरच ऑस्ट्रलियन युवतीशी विवाह केला आणि लगेचच ९७ धावांमध्ये ७ विकेट्स घेतल्या. त्यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजाना आपल्या गोलंदाजीने अक्षरशः पिडले होते.
बिशनसिग बेदी, चंद्रशेखर आणि इ. ए. एस. प्रसन्ना आणि जोडीला एकनाथ सोलकर यांनी अनके संघाना अक्षरशः हैराण केले होते विशेषतः इंग्लंड आणि ऑस्ट्रलिया. एक बाजूने चंद्रशेखर आणि दुसऱ्या बाजूने बिशनसिंग बेदी यांनी तर फारच सतावले होते इंग्लंडमधील एक समीक्षकाने बिशनसिंग बेदी यांची तुलना विल्फ्रेड होर्ड्सशी केली होती.
खरे पाहिले तर बिशनसिंग बेदी हे क्रिकेटचे अभ्यासक आहेत बेदी त्याचप्रमाणे चिकित्सकही आहेत. कुठल्याही गोष्टीची कारणमीमांसा ते अत्यंत विचार करून करतात त्यामुळे त्यांची अनेक स्टेटमेंट्स बिन्धास आणि कधीकधी वादग्रस्तही अनेकांना वाटतात परंतु ते विधान करण्याआधी त्यांनी पूर्णपणे आपण जे काही स्टेटमेंट करणार आहोत याचा विचार केलेला असतो. बिशनसिंग बेदी हे १९७६ मध्ये भारतीय संघाचे कप्तान झाले. १९७६ साली वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळलेला सामना जिकला त्यावेळी ते कप्तान होते. बिशनसिग बेदी यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ५०. ह्या धावा त्यांनी १९७६ मध्ये न्यूझिलंड विरुद्ध कानपुर येथे केल्या. कधी कधी बिशनसिंग बेदी गमतीदार विधाने करत एकदा ते म्हणाले होते माझे कपडे मीच धुतो त्यामुळे माझ्या खांद्याला, हाताला आणि हातांच्या बोटाना चांगला व्यायाम होतो. बिशनसिंग बेदी यांच्याबद्दल अनेक वाद देखील त्यावेळी होत असत. परंतु खेळ म्हटला की हे असे वाद होणारच हे गृहीत धरले पाहिजे. १९७६-७७ मध्ये जॉन लिव्हर याने चेन्नई मध्ये दुसऱ्या कसोटी समान्यांच्यावेळी व्हॅसलिन चेंडूला लावत असे हे लक्षात आले तर डोळयांवर घाम येऊ नये म्हणून ती व्हॅसलीनची पट्टी लावतो असे मग त्याने सांगितले होते.
बिशनसिग बेदी यांनी ६७ कसोटी सामन्यांमध्ये ६५६ धावा केल्या २८.७१ च्या सरासरीने २६६ विकेट्स घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये ९८ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या होता. त्यांनी फक्त १० एकदिवसीय सामने खेळले आणि त्यामध्ये ७ विकेट्स घेतल्या परंतु त्यांनी ३७० फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ३५८४ धावा केल्या आणि २१.६९ सरासरीने १५६० विकेट्स घेतल्या. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १०६ वेळा एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त खेळाडू बाद केले. तर २० वेळा एक सामन्यांमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त खेळाडू बाद केले. त्यांनी एक इनिंगमध्ये ५ धावा देऊन ७ खेळाडू बाद केले होते. त्याचे टी २० या क्रिकेटबद्दल मत अनुकूल नाही सतत ते त्यावर टीका करताना दिसतात. ते म्हणतात टी २० हे माणसाला गुदमरून टाकते आणि क्रिकेटचे अत्यंत वल्गर रूप आहे. त्याची विधाने नेहमीच परखड असतात.
त्यांचा मुलगा अंगद हा अंडर १९ क्रिकेट खेळलेला असून सध्या तो अभिनेता आहे. तो मॉडेलिंग करतो आणि सिरिअल्स मध्ये कामे करतो. त्याचप्रमाणे त्यांची मुलगी नेहा ही देखील एका चॅनलवर कॉरस्पॉउंट आहे.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply