बॉब जॉर्ज डिलन विलिस यांचा जन्म ३० मे १९४९ रोजी इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे वडील बी.बी.सी. मध्ये काम करत होते. बॉब त्याच्या बहीण आणि भावाबरोबर बागेत क्रिकेट खेळत असत. १९६५ साली बॉबने स्वतःच स्वतःचे दुसरे नाव ठेवले ते म्हणजे डिलन . कारण सुप्रसिद्ध अमेरिकन गायक बॉब डिलनचा तो फॅन होता. बॉबचे शिक्षण गुईल्डफोर्ड येथील ‘ रॉयल ग्रामर स्कुल ‘ मध्ये झाले. त्यानंतर तो स्टोक डी ‘ अबेरनून क्लबकडून खेळू लागला पुढे तो त्या क्लबचा व्हाइस प्रसिडेंट झाला आणि त्यानंतर लाइफ मेंबरही झाला. तो फ़ुटबाँलही खेळत असे. त्याच्या गोलंदाजीमधील कसब पाहून त्याची सरे स्कुलसाठी आणि सरे क्लॉटसाठी निवड झाली. तेथे त्याला वटसियन इव्हान्स यांचे मार्गदर्शन लाभले आणि पुढे तो त्याचा मित्रही झाला.
१९६८ मध्ये बॉब विलिस यांना मिडलसेक्स आणि सरे यंग क्रिकेटियर्सकडून पाकिस्तानच्या टूरसाठी बोलवणे आले ते त्याने स्वीकारले. तेथे त्याला आपले गोलंदाजीमधील कसब दखवण्याची संधी मिळाली. पुढे इंग्लंडचा अॅलन वॉर्ड जखमी झाल्यामुळे बॉब विलिसला कसोटी सामना खेळण्याची मिळाली. बॉब विलिस याने पहिला कसोटी सामना ९ जानेवारी १९७१ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला . तो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना होता. त्यावेळी इंग्लंडने फलंदाजी करून ३३२ धावा केलेल्या होता . बॉब विलिसने गोलंदाजी करताना ९ शतकामध्ये फक्त २६ धावा दिल्या. त्यावेळी इंग्लंडच्या डेरेक अंडरवूड याने ४ विकेट्स घेतल्या होत्या आणि ऑस्टेलियाचा खेळ २३६ धावांवर संपला होता.
बॉब विलीसने पहिला खेळाडू बाद केला तो अँशनी मॅलेट त्याचा झेल अॅलन नॉट याने सहा धावांवर घेतला .पाचव्या कसोटी सामन्यासाठी बॉब विलिसला इंग्लंडच्या संघामध्ये घेण्यात आले त्यावेळी त्याने पहिल्या इनिंगमध्ये ७३ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये ४२ धावा देऊन १ विकेट घेतली.
१९७७ च्या अँशेसच्या पाच कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामने झाले . १६ जून ला झालेल्या लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडने सर्वबाद २१६ धावा झाल्या परंतु त्यांना उत्तर देताना बॉब विलीसने ७८ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या.
भारतीयांना एक सुखद आठवण नेहमीच आठवते ती म्हणजे संदीप पाटील यांनी बॉब विलिसला जे सहा चौकार मारून २४ धावा एका षटकामध्ये केल्या . आजही ते सहा चौकार बघताना बॉब विलिसचा बदललेला चेहरा समोर येतो.
बॉब विलिस यानी ९० कसोटी सामन्यामध्ये ८४० धावा केल्या त्यांनी कसोटी सामन्यामध्ये ३२५ विकेट्स घेतल्या . बॉब विलिस यांनी ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स एक इनिंगमध्ये १६ वेळा घेतल्या . त्यांनी कसोटी सामन्यामध्ये ४३ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या. बॉब विलिस यानी ६४ एकदिवसीय सामन्यामध्ये २४.६० च्या सरासरीने ८० विकेट्स घेतल्या. त्यांनी एकदिवसीय सामन्यामध्ये एक इनिंगमध्ये ११ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. बॉब विलिस यानी ३०८ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ८९९ विकेट्स घेतल्या त्या २४.९९ सरासरीने . त्यांनी एका डावामध्ये ५ किंवा पाच पेक्षा जास्त विकेट्स ३४ वेळा घेतल्या. एका इनिंगमध्ये ३२ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या.
बॉब विलिस १६ जुलै १९८४ रोजी शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळले.
बॉब विलिस निवृत्त झाल्यावर १९८५ पासून चॅनेलवर समालोचक म्ह्णून काम करू लागले.
बॉब विलीस यांचे ४ डिसेंबर २०१९ रोजी निधन झाले
— सतीश चाफेकर.
Leave a Reply