नवीन लेखन...

प्रसिद्ध क्रिकेटपटू कार्ल हुपर

कार्ल हूपरचा जन्म १५ डिसेंबर १९६६ रोजी गयाना येथे झाला. तो वेस्ट इंडिजकडून खेळत असताना तो ऑल राउंडरची भूमिका अत्यंत योग्य प्रमाणे पार पडत असे. विशेष म्हणजे तो तो स्लिप मध्ये , सेकंड स्लिपला उत्तम क्षेत्रररक्षण करत असे. तो तीन खेळाडूंपैकी एक होता ज्याने १८ वेगवेगळ्या इंग्लिश कौंटी सामन्यांमध्ये शतक केलेले आहे. त्यानंतर मार्क रामप्रकाश आणि २००४ मध्ये ख्रिस अॅडम्सने हाच विक्रम केला.
कार्ल हूपरने त्याचा पहिला कसोटी सामना ११ डिसेंबर १९८७ रोजी भारतीय संघाविरुद्ध खेळला . त्या सामन्यादरम्यान त्याचा २१ वा वाढदिवस होता. कार्ल हुपर हा जगातील असा खेळाडू होता की ज्याने ५००० धावा केल्या , १०० विकेट्स घेतल्या आणि १०० झेल पकडळे आणि विशेष म्हणजे हा पराक्रम त्याने कसोटी सामन्यामध्ये केला त्याचप्रमाणे एकदिवसीय सामान्यामध्येही केला आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही केला. पुढे त्याचा हा रेकॉर्ड जॅक कॅलिसने मोडला. त्याने त्याच्या दुसऱ्या सामान्यातच भारताविरुद्ध खेळताना इडन गार्डनवर शतक केले. त्याने अचानक १९९९ मध्ये निवृत्ती जाहीर केली कारण त्याचा मुलगा आजारी होता आणि त्याच्या कुटूंबाला त्याची गरज होती.
शेन वॉर्न देखील कार्ल हूपरला खूप मानत असे कारण त्याचे फूटवर्क जबरदस्त होते . त्यावेळी त्याचे नाव टॉप १०० क्रिकेटपटूंमध्ये घेतले जायचे. शेन वॉर्न पुढे म्हणतो की १९९५ मध्ये त्याला चेंडू टाकताना मला जाणवत होते इतर खेळाडू फलंदाजीला आले की पोझिशन घेण्यासाठी खाली बघतो परंतु कार्ल हूपर मात्र सेट झालेल्या फलंदाजाप्रमाणे चेंडूची समोर बघूनच वाट बघत असे. त्यानंतर त्याचे सतत निरीक्षण करून करून मी त्याला पुढे ‘ ब्रेक ‘ करू शकलो. परंतु त्याला माझा चेंडू टोलवायचा असेल तेव्हा तो सहजपणे टोलवयाचा तेव्हा मी काहीच कर शकत नसे.
त्याआधी १९९८ मध्ये त्याचे त्याच्या क्रिकेट बोर्डाशी मतभेद झाले होते ते खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनावरून . दोन वर्षांनंतर तो परत वेस्ट इंडिजच्या टीममध्ये आला.
कार्ल हूपरने १०२ कसोटी सामन्यांमध्ये ५,७६२ धावा केल्या त्यामध्ये १३ शतके आणि २७ अर्धशतके आहेत तर त्याची सर्वोच्च धावसंख्या होती २३३ धावा . त्याचप्रमाणे त्याने १४४ विकेट्स घेतल्या त्यामध्ये त्याने एका इनिंगमध्ये २६ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या आणि ११५ झेल घेतले. कसोटी सामन्यापेक्षा तो एकदिवसीय सामने जास्त खेळला त्याने २२७ एकदिवसीय सामन्यामध्ये ५,७६१ धावा केलेय त्यामध्ये त्याने ७ शतके आणि २९ अर्धशतके केली. एकदिवसीय सामन्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ११३ धावा. त्यांनी एकदिवसीय सामन्यामध्ये १९३ विकेट्स घेतल्या आणि त्याचबरोबर त्यांनी ३४ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. तसेच त्यांनी १२० झेलही पडले.
कार्ल हूपरने ३३९ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये २३,०३४ धावा केल्या त्यामध्ये त्यांने ६९ शतके आणि १०४ अर्धशतके केली. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद २३६ धावा. त्याचप्रमाणे त्याने ५५५ विकेट्स घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये ९३ धावांमध्ये ७ विकेट्स घेतल्या आणि ३७५ झेल पकडले. मला आठवतंय त्याला मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये मला त्याला भेटता आले , सामन्याच्या दोन दिवस आधी तो त्याच्या मित्राबरोबर स्टेडियम बघायला तो आला होता तेव्हा मी त्याची स्वाक्षरी घेतली होती.
कार्ल हूपरने शेवटचा कसोटी सामना ३ नोव्हेंबर २००२ रोजी भारतीय संघाविरुद्ध खेळला कारण तरुण खेळाडूंना संधी मिळावी म्हणून त्याने खरे तर निवृत्ती स्वीकारली होती. तर एकदिवसीय सामना ४ मार्च २००३ रोजी केनिया विरुद्ध खेळला . निवृत्तीनंतर त्याने , त्याच्या भावाने आणि पत्नीने अँडलेटमध्ये कॉफी बार चा व्यवसाय सुरु केला. त्या कॉफी शॉपची चेन निर्माण केली. त्याचप्रमाणे त्याने करन्सी बदलण्याचा व्यवसाय सुरु केला. अर्थात ही त्याची हॉबी होती. २०११ मध्ये कार्ल हूपर हा बार्बाडोस येथे एका क्रिकेटच्या परफॉर्मन्स सेंटरचा फलंदाजीचा कोच होता.
त्याचप्रमाणे कार्ल हुपर हा आय. पी. एल . च्या विरुद्ध होता , ऑक्टोबर २०१२ मध्ये तो म्हणाला होता आय. पी. एल . हे क्रिकेट जगाला धोकादायक आहे , क्रिकेटला थ्रेट आहे.
— सतीश चाफेकर.
Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..