नवीन लेखन...

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सर जॅक हॉब्ज

सर जॅक बेरी हॉब्ज यांचा जन्म १६ डिसेंबर १९८२ रोजी इंग्लंडमधील केंब्रिज येथे झाला. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्याच्या घरची खूप गरिबी होती . त्यामुळे लहानपणीच क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे ठरवले . त्यांची सुरवातीची फलंदाजी फारशी समाधानकारक नव्हती १९०१ मध्ये स्थानिक क्रिकेट संघाकडून खेळू लागले . जॅक हॉब्ज यांना क्रिकेट विश्वामध्ये ‘ द मास्टर ‘ या नावाने संबोधले जाते. १९०३ मध्ये त्यांनी सरे कडून खेळण्यास सुरवात केली त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थाने ते ‘ द मास्टर ‘ होते कारण त्यांचा फलंदाजीचा आलेख बघीतला तर ते पटते कारण त्यांच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये १५ शतके तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १९९ शतके आहेत. ते राइट हॅन्ड पेस गोलंदाज होते आणि उत्तम क्षेत्ररक्षकही होते. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी ८८ धावा केल्या आणि पुढल्या दुसऱ्याच सामन्यामध्ये शतक केले. १९०८ पर्यंत ते उत्तम खेळाडू म्ह्णून सिद्ध झाले होते. त्यांनी इंग्लंड कडून पहिला कसोटी सामना १ जानेवारी १९०८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला . पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी ८३ धावा केल्या.
१९११-१२ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्याच्या सिरीजमध्ये ३ शतके केलेली पाहून सर्व टीकाकारांच्या मते ते जगात, जगामधले ‘ बेस्ट बॅट्समन ‘ ठरले होते . १९१४ पर्यंत कौंटी क्रिकेटमध्ये आक्रमकता आणि त्यांची खेळण्याची आकर्षक पद्धत यामुळे ते यशस्वी झाले होते . पहिल्या महायुद्धानंतर त्यांचे क्रिकेट करिअर विस्कळीत झाले ते त्याच्या अपेंडीसच्या दुखण्यामुळे . त्यामुळे त्यांचा १९२१ कुठलाही कसोटी सामना खेळू शकले नाही . आजारानंतर जेव्हा परत ते खेळू लागले तेव्हा ते अत्यंत सावधपणे आणि बचावात्मक पद्धतीने खेळू लागले. त्यामुळे कसोटी सामने आणि कौंटी सामने यामध्ये त्यांनी शेवटपर्यंत सातत्याने खेळ केला.
जॅक हॉब्स यांचे यश हे त्यांच्या चपळ फुटवर्क आणि त्यांची क्षमता असल्यामुळे ते वेगवेगळे फटके मारत असत . त्याच्याकडे क्रिकेटमधील क्लासिक फटके आणि प्रभावी डिफेन्स होता. ज्या खेळपट्ट्या खेळण्यासाठी कठीण असत त्या खेळपट्टीवर ते यशस्वीपणे खेळत असत. जॅक हॉब्ज हे पहिले यशस्वी फलंदाज होते की ज्यांनी ‘ गुगली ‘ गोलंदाजांना निष्प्रभ करण्याचे तंत्रज्ञान जगासमोर आणले. त्यांनी अनेक मोठमोठया फलंदाजाबरोबर सलामीला खेळायला येऊन यशस्वी खेळी केल्या . त्यामध्ये टॉम हॉवर्ड , अँडी सॅनडहम , विल्फ्रेड व्होर्डस यांचा समावेश होतो. त्यांनी इंग्लंडच्या हर्बर्ट सूटक्लिफ बरोबर केलेली पहिल्या विकेटसाठी भागीदारी टेस्ट हिस्टरीमध्ये नमूद करण्यासारखी आहे. त्या दोघांनी ३८ इनिंग्समध्ये १५ शतकासह ३२४९ धावा ८७.८१ या सरासरीने केल्या. ही भागीदारी २०१६ पर्यंत अबाधित होती.
जॅक हॉब्स हे अत्यंत लोकप्रिय क्रिकेटपटू होते. आजच्या पिढीला जॅक हॉब्ज यांची माहिती नसेल तर त्यांनी ती करून घ्यावी. त्यात्यांचे काही व्हिडिओज आजही बघायला मिळतील , विशेषतः ज्यावेळी कुठलेच कडक नियम नव्हते आणि हेल्मेट नव्हते त्यावेळी ह्या क्रिकेटपटूंनी कशा धावा केल्या असतील याचा विचार केला पाहिजे. ते ज्या धावा करत ते त्यांच्या उत्तम टेक्निकमुळे हे तर सिद्ध झलेचं आहे. कारण असे टेक्निक आपल्याला अभावाने हल्ली आढळत असते. ते चेंडू जवळ आला की विशिष्ट पद्धतीने पॅडवर घेत असत त्यावरून विवादही होत असत.
१९५३ साली त्यांना ‘ सर ‘ हा किताब देण्यात आला .
जॅक हॉब्स यांच्या खेळाचा प्रोफाइल पाहिला तर थक्क व्हायला होते. त्यांनी ६१ कसोटी सामन्यामध्ये ५६.९४ या सरासरीने ५,४१० धावा केल्या त्यामध्ये त्यांची १५ शतके आणि २८ अर्धशतके होती. त्यांची कसोटी समान्यांमधील सर्वोच्च धावसंख्या होती २११ . तर त्यांनी ८३४ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ५०.७० च्या सरासरीने ६१,७६० धावा केल्या त्यामध्ये त्यांची १९९ शतके आणि २७३ अर्धशतके होती . त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ३१६ त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १०८ विकेट्सही घेतल्या त्यामध्ये एका इनिंगमध्ये त्यांनी ५६ धावा देऊन ८ विकेटसह घेतल्या. त्याचप्रमाणे त्यांनी ३४२ झेलही घेतले.
अशा जबरदस्त ‘ द मास्टर ‘ सर जॅक हॉब्स यांचे २१ डिसेंबर १९६३ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..