प्रख्यात दूरदर्शन निर्मात्या डॉ.किरण चित्रे यांचा जन्म ९ जूनला झाला. डॉ.किरण चित्रे यांना प्रसारण क्षेत्रांत खूप जण मानतात. किरण चित्रे या निर्मिती सहाय्यक ते सहाय्यक संचालक एवढ्या पदापर्यंत विविध स्तरांवर दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर गेली ३३ वर्ष कार्यरत होत्या.
डॉ.किरण चित्रे या माहेरच्या किरण तासकर. डॉ.किरण यांचा जन्म अहमदनगरचा. बालपण शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर येथे व महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालय मुंबईत झाले. डॉ.किरण यांना लहानपणापासून शाळेच्या कार्यक्रमात व महाविद्यालयात भाग घेण्याची आवड होती. त्यांच्या आई गात असत. त्या संगीताच्या शिक्षिका होत्या, त्यामुळे किरण लहानपणापासून काही काळ गाणे शिकल्या होत्या. काही काळ त्यांनी कथ्थकचे शिक्षणही घेतले होते. पण पुढे त्यांनी त्यात करीयर न करता वेगळे करीयर केले. एसएससी झाल्यावर त्यांचे लग्न झाले, पुढे त्यांनी शिक्षण पूर्ण करून काही काळासाठी त्या पुण्यात आल्या.पुण्यात असताना त्यांनी एमए केले व पुढे त्यांनी मराठी कादंबरी या विषयावर त्यांनी पुणे युनिवर्सिटीतून पीएचडी केली आहे. विशेष म्हणजे ही पीएचडी त्यांचे लग्न झाल्यावर व नोकरी सांभाळून केली आहे. डॉ.भालचंद्र फडके हे त्यांचे पी.एच.डी.साठीचे मार्गदर्शक होते. त्याच वेळी १९७२ साली डॉ.किरण चित्रे यांना दूरदर्शनला निवेदिका म्हणून नोकरी मिळाली. काही काळानंतर त्या निर्मिती विभागात काम करू लागल्या. पण त्या कायम स्वरूपी नसल्याने त्यांना दूरदर्शन मधून ब्रेक मिळाला, त्यामुळे त्यांनी एअर इंडियात नोकरी करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात दूरदर्शनवर शालेय चित्रवाणीची सुरुवात झाली होती. तेथील मुख्य होते अन्डीअप्पन. त्यांनी किरण चित्रे यांना बोलवून घेऊन त्यांना दूरदर्शनवर शालेय चित्रवाणी साठी काम करण्यास सांगितले.
काही काळ या विभागात काम केल्यावर त्यांनी स्वतंत्र पणे दूरदर्शनसाठी निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला “मुलखावेगळी माणसे” हा कार्यक्रम होता. पुढे दूरदर्शन साठी त्यांनी खूप वर्षे ‘शब्दांच्या पलीकडले’, ‘मुखवटे आणि चेहरे’, अशा दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली. अनेक साहित्य संमेलनांचे व नाट्य संमेलनांचे कव्हरेज केले. गाण्यापासून ते अभिनेते अभिनेत्रींच्या मुलाखती पर्यंत आणि सप्रेम नमस्कार पासून अनुबोध पटा निर्मीती पर्यंत असंख्य कार्यक्रम सादर केले आहेत. निवृत्ती नंतर त्या अजून दूरदर्शनच्या संपर्कात असून कालच त्यांचा संगीतभूषण पं. राम मराठे ह्यांच्या कारकीर्दीवर एक लघुपट डी डी सहयाद्री वर दाखवण्यात आला आहे. तसेच त्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे काम बघत असतात. डॉ.किरण चित्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
डॉ.किरण चित्रे यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत.
https://www.youtube.com/watch?v=s-h5ki0pg_0
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply