नवीन लेखन...

भारताचे नामवंत अर्थशास्त्रज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ

भारताचे नामवंत अर्थशास्त्रज्ञ व थोर विचारतज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ जन्म १० एप्रिल १९०१ रोजी नागपूर येथे झाला.

धनंजय गाडगीळ यांचे शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात व केंब्रिजच्या क्वीन्स कॉलेजात झाले. इंग्लंडमध्ये एम्‌.ए.आणि डी. लिट्‍. पदव्या संपादन केल्यावर मुंबई सरकारच्या अर्थखात्यात त्यांनी १९२४-२५ मध्ये एक वर्ष नोकरी केली. सुरत येथील एम्‌. टी. बी. महाविद्यालयाचे प्राचार्यपद पाच वर्षे सांभाळल्यानंतर १९३० पासून ते पुण्याच्या ‘ गोखले अर्थशास्त्र संस्थे ’ च्या संचालकपदी रुजू झाले. वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत तेथे निष्ठापूर्वक काम करून त्यांनी तेथे निष्ठापूर्वक काम करून त्यांनी ती संस्था नावारूपाला आणली. पुण्याच्या `गोखले अर्थशास्त्र संस्थे’च्या उभारणीचे कार्य १९३० पासून १९६६ पर्यंत सांभाळताना त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला समतोल मार्गदर्शन केले. रयत शिक्षण संस्थेच्या वाढत्या कार्याला त्यांनी प्रथमपासून जिव्हाळ्याने साथ दिली. सहकारी चळवळीची वाढ, विशेषतः सहकारी साखर कारखान्याची उभारणी याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागते.

१९६६-६७ साली ते पुणे विद्यापीठाचे कलागुरू होते. काही वर्षे ते राज्यसभेचे सभासद होते. सप्टेंबर १९६७ मध्ये त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारले. धनंजय रामचंद्र गाडगीळ यांना भारतातील सहकारी चळवळीचे आद्य प्रणेते मानले जाते. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने व सहकारी बँका वाढीस लावण्याचे श्रेय त्यांना आहे. भारताच्या अर्थकारणाचा, विशेषतः कृषिविषयक जटिल समस्यांचा, सखोल अभ्यास करून त्यांनी आपले मूलग्राही विचार अनेक ग्रंथांतून व लेखांतून मांडले. सरकारने नेमलेल्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. अनेक आर्थिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांनी लिहिलेली पंचविसांहून अधिक पुस्तके प्रसिद्ध असून द इंडस्ट्रियल ईव्हलूशन इन इंडिया (१९२८), द फेडरल प्रॉब्लम इन इंडिया (१९४४), रेग्युलेशन ऑफ वेजिस (१९५४), प्लॅनिंग इन इंडिया अँड इकॉनॉमिक पॉलिसी (१९६१) यांसारख्या ग्रंथांतून त्यांच्या तर्कशुद्ध व साक्षेपी दृष्टिकोनाचा प्रत्यय येतो.

गोखले अर्थशास्त्र संस्थेने गाडगीळांचे मराठीतील समग्र लिखाण ध. रा. गाडगीळ लेखसंग्रहनामक दोन खंडांत (१९७३ -१९७४) प्रकाशित केले आहे. निव्वळ आर्थिक सिद्धांतांचे विश्लेषण करण्यावर भर न देता त्यांचा व्यावहारिक उपयोग करण्यावर गाडगीळांचा कटाक्ष असे. आर्थिक विकास लोकाभिमुख असावा, असे मत ते आग्रहाने मांडीत. लोकमान्यांचे शिष्यत्व पत्करणाऱ्या प्रा. धनंजयराव गाडगीळ यांची भूमिका उदारमतवादी आणि व्यापक स्वरूपाची होती. डॉ. आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या महान कार्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते. समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांत गाडगीळ वावरले.

धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे ३ मे १९७१ रोजी निधन झाले.वंत धनंजय रामचंद्र गाडगीळ

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..