कवी, गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त विश्वस्त आनंद माडगूळकर ग. दि. माडगूळकर यांचे चिरंजीव असून एक मराठी लेखक आहेत.
ग. दि. माडगूळकर यांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य आनंद माडगूळकर पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार हून अधिक प्रयोग देशात आणि परदेशांत सादर केले आहेत. या प्रयोगाच्या दरम्यान रसिकांना गीतरामायण कसे घडले हे जाणून घेण्यात स्वारस्य आहे, हे त्यांना जाणवले. आनंद माडगूळकर यांनी ‘गीतरामायणाचे रामायण’ व ‘जिप्सीच्या वाटा’ ही पुस्तके लिहिली आहेत. यात गीतरामायणाचा हा इतिहास आनंद माडगूळकरांनी लिहून पुस्तक रूपाने प्रकाशित केला आहे.
गदिमांच्या काही निवडक साहित्यकृतींचा मनसोक्त आस्वाद रसिक श्रोत्यांना घेता यावा या उद्देशाने,अक्षय तृतियेच्या सुमुहूर्तावर आनंद माडगूळकरांनी “पॉडकास्ट” सुरू केला आहे.
हा podcast Hubhopper, Spotify व Gaana या mobile apps वर, त्याच प्रमाणे online देखील उपलब्ध आहे.
पुण्यात गदिमांचे स्मारक उभारण्याबाबत ते गेले अनेक वर्षे पाठ पुरावा करत होते नुकतेच याला यश आले असून ग. दि. माडगूळकर यांच्या कोथरूड येथील महात्मा सोसायटी येथे साकारण्यात येत असलेल्या स्मारकाचे मार्च २०२१ मध्ये भूमिपूजन झाले आहे. कोथरूड येथील नियोजित एक्झिबिशन सेंटर या प्रकल्पातील सुरुवातीच्या भागातील इमारतीमध्ये गदिमा स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. स्मारकाचे एकूण बांधकाम क्षेत्र ९३१ चौरस मीटर असून या स्वतंत्र इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमांचे स्मारक आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणारी विविध दालने करण्यात येणार आहेत
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply