विख्यात व्हायोलीन वादक व गायक मा. पं गजाननबुवा जोशी यांचा जन्म ३० जानेवारी १९११ रोजी झाला.
ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा ह्या तीनही घराण्याच्या गायकीवर एकाच वेळी प्रभुत्व मिळवून त्याच वेळी एक विख्यात व्हायोलीन वादक म्हणूनही किर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त केलेले पं. गजाननबुवा जोशी ह्यांनी शास्त्रीय संगीताच्या विश्वात आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे एक गौरवशाली असे स्थान निर्माण केले आहे.
हातचे राखून न ठेवता आपल्याकडचे सारे शिष्यांना देणाऱ्या गुरूंपैकी गजाननबुवा एक होते. संगीताचा विद्यार्थी म्हणूनच जगायचे, वावरायचे हेच त्यांचे ध्येय होते, त्यामुळे शेवटपर्यंत ते विद्यार्थी म्हणूनच वावरले, जगले व शिकत राहिले. दौऱ्याहून परतल्यानंतर आपले अनुभव सांगतील म्हणून सगळे उत्सुक असायचे, पण बुवा खिशातून एखादा कागदाचा कपटा काढून त्यावर लिहून आणलेली बंदीश शिकविण्यात दंग होऊन जायचे. वाळूतून तेल निघेल एवढी मेहनत घेणाऱ्यांपैकी गजाननबुवा एक तालिया होते. स्वरांचा सच्चा असलेला हा माणूस व्हायोलिन केवळ वाजवतच नसे, तर त्यांचे व्हायोलिन गात असे. गाणे बोलायचे नाही तर ते गाण्याशी बोलायचे, असा हा आदळआपट न करणारा महान तालिया होता.
गजाननबुवा जोशी यांचे २८ जून १९८७ निधन झाले. गजाननबुवा जोशी यांचे दुर्मिळ रेकॉर्डिंग इंटरनेटवर उपलब्ध आहे.
http://www.gajananbuwajoshi.com
— संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply