नवीन लेखन...

प्रख्यात मल्ल गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

प्रख्यात मल्ल गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव  यांचा जन्म ३१ डिसेंबर १८७८ रोजी बडोदे येथे झाला.

वस्ताद जुम्मादादांचे शिष्य व अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणाऱ्या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्येही त्यांनी गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. लाठी, लेझीम, फरीगदगा, लकडी, बनेटी, जोडी, असे देशी खेळ व व्यायाम प्रकारांचे शास्त्र निर्माण करून त्यांना सांघिक व्यायामाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम माणिकरावांनी केले. सैनिकी संचलन व कवायतींसाठी हिंदी आज्ञाशब्द बनवले.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माणिकरावांना बडोदा सरकारने ‘राजरत्न’ व ‘राजप्रिय’ अशा पदव्या देऊन गौरवले.

बडोद्याच्या ‘लक्ष्मीविलास’ राजवाडय़ात भव्य शस्त्रसंग्रहालय उभारणाऱ्या माणिकरावांनी ‘प्रतापशस्त्रागार’, ‘भारतीय व्यायाम’ हे ग्रंथ लिहिले.

गजानन यशवंत माणिक यांचे २५ मे १९५४ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..