संशोधक, समीक्षक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म २४ सप्टेंबर १९२१ रोजी झाला.
एस. एन. डी. टी. महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख असणार्या डॉ.मालशे यांनी फादर स्टीफन्स यांच्या ख्रिस्त पुराणावर विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ आणि ‘मराठी संशोधन पत्रिके’चे ते संपादक होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि मुंबई साहित्य संघाचे अध्यक्ष असणाऱ्या डॉ.मालशे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सहकार्याने ‘समग्र महात्मा फुले’ ग्रथांचे संपादन केले होते. याबरोबरच ‘आहे आणि नाही’, ‘जर-तर’ हे ललित लेखसंग्रह आणि ‘नाट्य परामर्थ’, ‘साहित्य सिद्धान्त’ ही त्यांची अन्य पुस्तके. सखाराम गंगाधर मालशे यांचा आपल्या संशोधनपर लेखनामुळे साहित्यप्रांतात कर्तृत्वाचा ठसा उमटवून राहिला.
डॉ.सखाराम गंगाधर मालशे यांचे ७ जून १९९२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply