नवीन लेखन...

संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

केंद्र शासनाच्या सूचनेवरून सहकार कायद्यात २०११-२०१२ पासून २०१९-२०२० पर्यत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. बऱ्याच सुधारणा अमलात आणण्याआधीच नविन सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे अनेकदा सदस्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते. बऱ्याच सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये काम करण्यास सदस्य उत्सुक नसतात. त्यात वारंवार होणारे बदल याची काहीही कल्पना नसते. संस्थेमध्ये उपविधीची प्रत मागणी केल्यास उपलब्ध होत नाही. काही संस्थाचा पत्रव्यवहार पाहून तर मला असे आढळून आले की, बरेच जण उपविधीला कायदा समजतात. अनेक संस्थांमध्ये तर त्यांचा स्वत: तयार केलेला कायदा चालतो. जे कायद्याने चुकीचे आहे. प्रत्यक्षात (कायदा) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०; (रुल्स) महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१, (बाय लॉज) उपविधी, परिपत्रके, आदेश या सर्व वेगवेगळ्या असून या बाबी एकत्र पहाव्या लागतात. तरीही कधी मनात आले की निवडणूक किंवा सर्व पदाधिकारी यांनी एकाच वेळी राजीनामा देणे आणि सरकारी अधिकृत व्यक्ती संस्थेत आणले म्हणजे खूप चांगले केले असे वाटत असले तरी काही महिन्यांनी पुन्हा संस्थेच्या सदस्यांना पुढाकार घ्यावाच लागतो.

प्रश्न क्र.८६) संस्थेच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याची नोटीस सदस्याने कोणास दयायचे असते? सदर नोटीस देण्यास काही नियम असतात का?

उत्तर: होय. सदस्याने संस्थेच्या सचिवाकडे नियमावलीच्या नियम २१(१) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे विहित नमुन्यात तीन महिन्याची नोटीस देऊन आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देणे आवश्यक असते.

प्रश्न क्र.८७) समितीस सदस्याने संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनाम्याची नोटीस दिल्यावर तो स्वीकारणे बंधनकारक असते का?

उत्तर: संस्थेस अदा करावयाच्या रकमा पूर्ण भरल्याशिवाय संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा समितीकडून स्विकारला जात नाही. तसेच, समितीत, याबाबतच्या कारणांची नोंद घेईल आणि तसे संबंधित सदस्यास, सदर कारणे राजीनाम्याची नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांचे आत कळवील. सदस्याकडून संस्थेस काहीही येणे बाकी नसेल तर, समिती अशा सदस्याचा राजीनामा स्वीकारील व राजीनाम्याची नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ३ महिन्याच्या आत सचिवांकडून सदस्यास तसे कळविण्यात येईल.

प्रश्न क्र.८८) राजीनामा देऊ इच्छिणाऱ्या सदस्याकडून संस्थेस देय असलेली अदत्त रक्कम कशा प्रकारे कळवतात?

उत्तर: राजीनामा देऊ इच्छिणाऱ्या सदस्याकडे संस्थेची काही येणे बाकी असेल तर अशा येणे रकमेच्या तपशीलाबाबतची खुलासेवार माहिती देऊन संस्थेचे सचिव राजीनाम्याची नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांचे आत सदस्याला तसे कळविल आणि राजीनाम्याचे नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांचे आत ती रक्कम भरण्यास सांगेल.

प्रश्न क्र.८९) सहयोगी सदस्याचा राजीनामा स्वीकारण्याची पद्धत काय असते?

उत्तर: सहयोगी सदस्य, ज्या सभासदांबरोबर संयुक्तपणे त्याने संस्थेचे भाग धारण केले असतील त्यांचेमार्फत संस्थेच्या सचिवास राजीनाम्याचे पत्र लिहून केव्हाही आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊ शकेल. संस्थेच्या सचिवाला, मूळ सभासदाकडून सहयोगी सभासदाचा राजीनामा स्वीकृत करण्याबद्दलच्या रीतसर शिफारशीसह आलेले सहयोगी सभासदाच्या राजीनाम्याचे पत्र ते मिळाल्याच्या तारखेच्या लगतनंतर भरलेल्या समितीच्या सभेपुढे स्विकृतीसाठी ठेवील. समितीने सहयोगी सदस्याचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यास, निर्णय घेतल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत संस्थेच्या सचिवाकडून मूळ सभासद व त्याचा सहयोगी सभासद यांना तो निर्णय कळविण्यात येईल. जर राजीनामा स्वीकारण्यात आला नाही तर समिती तो न स्वीकारल्याची कारणे सभेच्या इतिवृत्तात नमूद करील व संस्थेचा सचिव वर विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत सदस्यास व त्याच्या सहयोगी सदस्यास समितीचा निर्णय कळवील.

प्रश्न क्र.९०) समितीने नमूद केलेल्या कालावधीत सदस्यास निर्णय न कळवल्यास?

उत्तर: समितीने सदस्याकडून राजीनाम्याचा अर्ज मिळाल्यापासून ३ महिन्याच्या आत मंजूर केला नाही तर तो स्वीकृत झाला असे गृहीत धरण्यात येईल.

– अ‍ॅड. विशाल लांजेकर.

4 Comments on संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

  1. आपल्या गृहनिर्माण संस्थेचा बाय-लॉ क्र. २७ वाचणे.

  2. समितीने सदस्याकडून राजीनाम्याचा अर्ज मिळाल्यापासून ३ महिन्याच्या आत मंजूर केला नाही तर तो स्वीकृत झाला असे गृहीत धरण्यात येईल.
    हे कोणत्या कलमा मध्ये दिले आहे??

  3. सर जर का? फक्त अध्यक्ष सचिव व खजिनदार यांनी पाच वर्षे पुर्ण व्हायच्या आधीच राजीनामे देऊन, निवडणूक आधीकारीची नेमणूक सर्वसाधारण सभेत नियुक्त करून नवीन समीती निवडून आनल्यास. अशी नवीन समीती कायदेशीर ठरत आहे का? ( जुन्या समितीत फक्त अध्यक्ष सचिव व खजिनदार यांनीच राजीनामे दिलेत व ईत्तर सदस्यांनी राजीनामे दिलेले नाहीत तर अशा समीतीचे विसर्जन झाले असे समजायचे का?)

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..