गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ/ व्यवस्थापन समिती/ पदाधिकारी हे गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेले सभासद असतात. सदर व्यवस्थापन समिती सभासद आणि संस्था यांचे विश्वस्त (Trustee) असतात. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने गृहनिर्माण संस्थेला जर काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिक व सामूहिकरीत्या त्या नुकसानीची जबाबदार असतात. सदर लेखात खास आपणासाठी व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या काय असतात याची माहिती देत आहे.
१) व्यवस्थापक समिती सदस्यांनी नि:स्वार्थी व प्रामाणिकपणे काम केले पाहिजे.
२) अधिमंडलाची वार्षिक सर्व साधारण सभा ३० सप्टेंबर किंवा आधी सभेची तारीख ठरवून आयोजित करणे.
३) समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक आणि चर्चा करून घेतले पाहिजेत.
४) संस्थेचे भांडवल आणि निधी योग्यप्रकारे गुंतवणूक केली पाहिजे.
५) आर्थिक वर्ष संपल्यानंतर ६ महिन्याच्या आत विवरणपत्रे तयार करून वैधानिक लेखापरीक्षकाकडे देऊन विहित नमुन्यात अधिमंडळाच्या सभेसमोर ठेवणे. दुरुस्ती अहवाल ऑनलाईन तसेच निबंधक कार्यालयात जमा करणे.
६) संस्थेची मालमत्ता किंवा फर्निचर स्वत:च्या फायद्यासाठी किंवा खाजगी कामासाठी करू नये.
७) सर्वसाधारण सभेत गृहनिर्माण संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत सत्य आणि वास्तव माहिती सभासदांना देणे.
८) एकूण सभासद संख्या २५० पेक्षा अधिक असेल तर व्यवस्थापक समितीचा कार्यकाळ सपण्याच्या आधी ६ महिने उपनिबंधक कार्यालयात निवडणूक राज्य प्राधिकरण यांच्याकडून घेण्याबाबत अर्ज करणे.
९) समितीमध्ये झालेल्या नैमित्तिक रिक्त झाल्यापासून १५ दिवसात निबधाकाना पत्राद्वारे माहिती देणे.
१०) मालमत्ता संस्थेच्या नावे वाजवी किमतीत खरेदी करावी.
— अॅड. विशाल लांजेकर.
नाही.
हौसिंग समिती सदस्यांचा पदावधी समाप्त झाल्या नंतर सदर कमिटी शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर, ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी देऊ शकते का?