नवीन लेखन...

झिजेचा संधिवात (ऑस्टिओआथ्रायटीस)

आपल्या घरातील, नात्यातील किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्यातील वयस्करांकडून एक तक्रार नेहमी ऐकू येते- गुडघेदुखीची! ज्येष्ठांच्या या समान तक्रारीला कारणीभूत असतो झिजेचा संधिवात. ही तक्रार का उद्भवते? आपल्या गुडघ्यांमध्ये दोन हाडांच्या मध्ये कूर्चा (गादी) असते. वयोमानानुसार किंवा वजनानुसार ही गादी घासली जाते. जेव्हा आपल्या गुडघ्यांवर वजन किंवा जोर पडतो तेव्हा ही गादी घासली गेल्यामुळे दोन्ही हाडेदेखील एकमेकांवर घासली जातात. या घर्षणामुळे ‘कट-कट’ असा आवाज येतो व गुडघे दुखतात. कधी जास्त घर्षण झाले तर गुडघ्याला सूजदेखील येऊ शकते.

ही गादी घासली जाणे, हा वयोमानानुसार | होणारा बदल आहे. किंबहुना ही पूर्णपणे | शारीरिक झिजेशी संबंधित अशी यांत्रिक प्रक्रिया आहे; पण दोन प्रमुख कारणांमुळे ही गादी लवकर व जास्त प्रमाणात घासली जाते. एक म्हणजे शरीराचे वजन जास्त असले, की आपल्या गुडघ्यांवर तेवढ्याच प्रमाणात जास्त जोर पडत असतो आणि म्हणूनच त्याची झीजही तेवढ्याच जास्त प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख कारण म्हणजे आपली जमिनीवर बसण्याची पद्धत.
आपण जेव्हा जमिनीवर बसून उठतो, तेव्हा आपल्या शरीराचा पूर्ण भार हा गुडघ्यावर असतो. खरेतर अशा वेळी गुडघ्यावर येणारा भार हा आपल्या शारीरिक वजनाच्या पाच ते सहापट असतो! त्यामुळे साहजिकच गुडघ्यातील गादी लवकर व जास्त प्रमाणात घासली जाते.
म्हणूनच शरीराचे वजन योग्य प्रमाणात राखणे आणि उतारवयात जमिनीवर उठबस न करणे, हे श्रेयस्कर. त्याने ‘गादी’ ची झीज कमी होते. उपचार पद्धती- गुडघ्याची झिजलेली गादी ठरावीक प्रमाणात पूर्ववत करण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. परंतु ही औषधे दुखण्याच्या सुरुवातीच्या काळात/ टप्प्यात उपयोगी असतात. दुखणे जुने किंवा गंभीर स्वरूपाचे असल्यास मात्र औषधाने फारसा फरक पडत नाही व शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

-डॉ. शशांक एकेरकर
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..