‘आर एच टी डी’ ते ‘रॉकेट्री’ – तोच धमाल, नैसर्गिक, खोलवर आर एम !
एकाच दिवशी दुपारी नेटफ्लिक्स (मेजर) आणि रात्री सहकुटुंब रॉकेट्री असे देशभक्तीचे डोस झाले. दोघांनीही देशासाठी बलिदान केले, फक्त एकाने जीवाचा त्याग केला आणि दुसऱ्याने जिवंत राहून दाखविले.
“माझा कट्टा ” वर रॉकेट्री चे दिलखुलास अनुभव सांगताना आर एम प्रांजळपणे म्हणाला- ” आता नो दिग्दर्शन, नो बायोपिक ! आता फक्त अभिनय आणि कधीतरी संधी मिळाली तर मराठी पॉलिश करूनच मराठीत काम करीन. पण आता बक्कळ पैसा कमवायचे आहेत. ”
अंतर्बाह्य निर्मळ, स्वच्छ असा हा अभिनेता कौटुंबिक फ्रंट बद्दल निखळ बोलला-
१) वडील- मला त्यांच्यासारखे व्हायला आवडेल.(प्रत्येक मुला-मुलीची हीच इच्छा नसते का?) माझ्या यशापयशाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. ते सदैव शांतपणे सगळं स्वीकारतात. त्यांची डिग्निटी मला आपलीशी करावीशी वाटते.
जगज्जेत्या सचिनचे वडीलही (प्रा रमेश तेंडुलकर) याच जातकुळीतील- स्थितप्रज्ञ !
२) आई- तिने दोन गोष्टी शिकविल्या (ती बँकेत कामाला होती). (अ) पैसा आणि नाती यांच्यात गल्लत करू नकोस. (ब) कोणालाही दुखावू नकोस आयुष्यात!
३) पत्नी (सरिता)- तिने वेगळ्या संस्कृतीमधून येऊनही (ती मराठमोळी कोल्हापुरी गर्ल आहे) माझ्या पालकांना आणि कुटुंबियांना खूप समजून घेतले आणि सांभाळून घेतले.
४) मुलगा (वेदांत)- तो म्हणतो- “पप्पा, मनानुभूती (फोकस ऑन प्रेझेण्ट ओन्ली) चा विचार करा. सगळीकडे मन भरकटू देऊ नका.”
म्हणून मी आकाशाएवढ्या नंबी सरांबद्दल लिहिण्याचे टाळून पडद्यामागच्या आर माधवन बद्दल लिहायचे ठरविले. कारण ते पात्र रंगविणारा तितक्याच उंचीचा असू शकतो. आता मला कळलं – असा माणूसच रॉकेट्री बनवू शकतो.
बाय द वे – शाहरुखचा येथे दुसऱ्यांदा पराभव झालेला दिसला – माधवन कडून ! पहिल्यांदा तो हरला होता “बिल्लू “मधील इरफान खान कडून !
अर्थात हे दोन्ही पराभव त्याच्यासाठी “मिरविण्यासारखे “खचित आहेत. एक पुसटती जखम त्याला “रईस “मध्ये नक्कीच झाली होती -नवाजुद्दीन सिद्दीकी कडून !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply