नवीन लेखन...

अमेरिकेचे ३७ वे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन

रिचर्ड निक्सन यांचा जन्म ९ जानेवारी १९१३ रोजी झाला.

रिचर्ड निक्सन यांनी २० जानेवारी १९६९ ते ९ ऑगस्ट १९७४ या कालखंडादरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दी अगोदर ते १९५३ ते १९६१ या कालखंडात ड्वाइट डी. आयझेनहॉवर याच्या अध्यक्षीय राजवटीत अमेरिकेचे ३६ वा उपराष्ट्राध्यक्ष होते, तर तत्पूर्वी रिचर्ड निक्सन हे १९४७ ते १९५० या काळात अमेरिकन संसदेत कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी व १९५० ते १९५३ या काळा सेनेट सदस्य होते. वॉटरगेट प्रकरणात याच्याविरोधात महाभियोग चालवला जाण्याची चिन्हे दिसल्यावर रिचर्ड निक्सन यांनी ९ ऑगस्ट १९७४ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पदाचा राजीनामा देणारा हे अमेरिकी इतिहासातला एकमेव राष्ट्राध्यक्ष होत.

कायद्याचा पदवीधर असलेल्या निक्सन यांनी आरंभी काही काळ वकिली केली. पुढे तो अमेरिकी नौदलात रुजू झाले व दुसर्याा महायुद्धात प्रशांत महासागराच्या आघाडीवर लढले. आपल्या पहिल्या अध्यक्षीय राजवटीत निक्सनाने व्हिएतनाम युद्धास वाढणारा वाढता देशांतर्गत विरोध लक्षात घेऊन व्हियेतनामातून अमेरिकन सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला, १९७२ साली चीनच्या जनता-प्रजासत्ताकास अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी सोव्हियेत संघाशी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. चंद्रावर मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना अपोलो ११ च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले. १९७२ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत निक्सन मोठ्या मताधिक्याने अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीसाठी निवडून आले.

दुसऱ्या मुदतीत मात्र निक्सन प्रशासनास अडचणींना सामोरे जावे लागले : योम किप्पुर युद्धात इस्राएलला अमेरिकेने पाठिंबा दिल्यामुळे अरब राष्ट्रांनी अमेरिकेशी तेलव्यापार बंद केला. याच सुमारास वॉशिंग्टन डी.सी.तील अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या घुसखोरीतूनु उद्भवलेले प्रकरण मोठ्या थरापर्यंत वाढून वॉटरगेट प्रकरण उघडकीस आले. निक्सन प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करूनही प्रकरण हाताबाहेर गेले व त्यामुळे निक्सन प्रशासनाने राजकीय आधार मोठ्या प्रमाणात गमावला. महाभियोग चालवला जाऊन अध्यक्षपदावरून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे १८ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी निक्सनाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अध्यपदावर आलेल्या जेराल्ड फोर्ड याने मात्र निक्सनास उद्देशून वादग्रस्त ठरलेला माफीनामा जाहीर केला. निवॄत्तीनंतर निक्सनाने आपल्या राजकीय अनुभवांवरून पुस्तके लिहिली व परदेश दौरे केले. त्यामुळे आधीची डागाळलेली प्रतिमा धुवून “अनुभवी, ज्येष्ठ मुत्सद्दी” म्हणून प्रतिमा सुधारण्यात त्याला यश आले. निक्सन हे पाकिस्तान समर्थक समजले जात असतं. त्यामुळेच त्यांनी अनेकदा भारताविरोधात निर्णय घेतले. राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे तत्कालीन सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांचे भारत, भारतीय यांच्याबद्दल अत्यंत वाईट मत होते, याचे अनेक दाखले किसिंजर यांच्या आत्मचरित्रपर ग्रंथापासून तत्कालीन अमेरिकी पत्रकारांच्या पुस्तकातून प्राप्त झाले आहेत.

रिचर्ड निक्सन यांचे २२ एप्रिल १९९४ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..