ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि समालोचक रिची बेनो यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९३० रोजी झाला.
बेनो हे ऑस्ट्रेलिया संघातील महान अष्टपैलू खेळाडू होते. ऑस्ट्रेलियाकडून ६३ कसोटी सामने खेळतानाच त्यांनी २८ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. यात हजारांपेक्षा अधिक धावा तसेच २०० पेक्षा अधिक बळी मिळवण्याची कामगिरी केली. १९६४ मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तत्पूर्वी, कारकीर्दीत एकही मालिका गमावणारा कर्णधार म्हणून त्यांनी विक्रम रचला होता. बेनो यांनी त्यांच्या क्रिकेट करीअर मधील सर्वात रोमांचक सामना १९६०-६१ मद्ये वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या गाबा मैदानात खेळला. हा सामना टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील पहिला टाय सामना ठरला. पाकिस्तानात श्रॄंखला जिंकणारे पहिले कर्णधार सुद्धा ठरले. बेनो फलंदाजीतही त्यांची छाप सोडण्यात यशस्वी ठरले. त्यांनी त्यांच्या करीअरमध्ये तीन शतकं लगावले. त्यांनी एकूण २,२०१ रन्स काढले आहेत.
बेनो यांनी १९६०च्या दशकात बीबीसी’साठी कमेंटेटर म्हणून काम करणे सुरू केले. त्यानंतर १९७७ मध्ये केरी पॅकर्स वर्ल्ड सिरीज क्रिकेट स्पर्धेसाठी कॉंमेंन्ट्री करण्यासाठी ऑस्ट्रेलियन चॅनल नाइन सोबतही जुळले होते.
बेनो यांना २००७ मध्ये एलन बॉर्डर सन्मान समारोहात क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या हॉल ऑफ फेम’ मध्येही जागा देण्यात आली आहे. त्यानंतर दोन वर्षांनी क्रिकेट परीषदेच्या हॉल ऑफ फेम’ यादीतही त्यांचे नाव नमूद करण्यात आले.
रिची बेनो यांनी तारुण्यात क्रिकेटचे मैदान गाजवले, तर नंतर मैदानाबाहेर राहूनही क्रिकेटशी असलेले नाते तुटू दिले नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील आजी-माजी खेळाडूंचे ते आदर्श राहिले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि बेनो हे एकमेकांस पूरक असे अविभाज्य घटक झाले होते. रिची बेनो यांचे निधन १० एप्रिल २०१५ रोजी झाले.
Leave a Reply