५ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न होणार्या विश्व साहित्य संमेलनानिमित्त……
सोपी मराठी … प्रवाही मराठी … अुत्क्रांत मराठी … समृध्द मराठी….
अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ
मराठीच्या आद्य लिपीकारांनी, अ ला काना लावून तयार झालेला आ स्वीकारला ……
मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला ओकार लावून तयार झालेला ओ स्वीकारला …..
मराठीच्या आद्य लिपीकारांनी अ ला औकार लावून तयार झालेला औ स्वीकारला …..
पण …..
मराठीच्या त्याच लिपीकारांनी अ ला अिकार लावून तयार झालेली अि …..
अ ला अीकार लावून तयार झालेली अी …..
अ ला अुकार लावून तयार झालेला अु …..
अ ला अूकार लावून तयार झालेला अू …
अ ला अेकार लावून तयार झालेला अे …
अ ला अैकार लावून तयार झालेला अै ….
स्वीकारले असते तर ……
इ, ई, उ, ऊ, ए, ऐ ही अक्षरचिन्हं घडविण्याची गरजच नव्हती.
हाच विचार, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रतिभावान द्रष्ट्या व्यक्तीला सुचला आणि त्यांनी, अि, अी, अु, अू, अे, अै ही अक्षरचिन्हं वापरण्यास सुरूवात केली. हीच अक्षरचिन्हं वापरून लेख लिहीले. अिसवीसन 1940 च्या सुमारास. पुण्याहून प्रसिध्द होणार्या, किर्लोस्कर, स्त्री वगैरे मासिकात प्रसिध्द झालेल्या मजकूरात हीच अक्षरचिन्हं वापरली आहेत, हे त्या काळी प्रसिध्द झालेल्या साहित्यात आढळतं. मी ही अ ची बाराखडी, गेली चाळीस वर्षे वापरतो आहे. माझ्या सर्व लेखात आणि पुस्तकात हीच बाराखडी वापरली आहे. डोळ्यांना आणि मेंदूला, या बाराखडीची सवय, लवकरच होते.
आपणही हीच अक्षरचिन्हं वापरावीत.
ही अक्षरचिन्हं वापरून तयार झालेले काही शब्द ……
अिंद्र, अिन्द्र, अिंदिरा, अिन्दिरा, अितक्यात, अितीहास, अिच्छा ….
अीश्वर, अीशस्तवन, अीशान्य, अीर्षा, ….
अुपकार, अुपवन, अुकळणं, अुचापत्या, अुंच, अुंट, ….
अून, अूब, अूर, अूस ….
अेक, अेकवीस, अेकाअेकी, अेकादशी, अेकूण …..
अैरावत, अैतिहासिक, अैवज, अैवजी, अैहिक …..
हे शब्द वाचतांना काही अडचण आली? लिहीतांनाही कठीण वाटणार नाही.
गजानन वामनाचार्य
180/4931 पंतनगर, घाटकोपर (पूर्व),
मुंबअी 400075.
मोबाअील :: 9819341841
आ, ओ आणि औ (अ + अु ) ही अ चीच रुपं आहेत आणि आपण ती स्वीकारली आहेत. तर मग अि, अी, अु, अू अे आणि अै (अ + अि ) का स्वीकारू नये?
अ + अि आणि अ + अु हे जोड स्वर, अे आणि ओ ची अेक मात्रा वाढवून, म्हणजे अै आणि औ अशी लिहीली, हा आद्य लिपीकारांचा प्रतिभा अविष्कार आहे. त्याचं कौतुकच केलं पाहिजे.
नमस्कार.
आपला अ ची बाराखडी हा लेख वाचला.
– सावरकरांनी अि, अु वगैरे सुचवले ते टाइपिंगच्या सुविधेसाठी. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! ( अर्थात्, माझ्यासारखा साधा माणूस सावरकरांसारख्या हिमालयाचें काय अबिनंदन करणार ! ).
– पण आतां संगणकामुळे, ई, उ, वगैरे स्वर सहज लिहिता येतात. त्यामुळे, सावरकारांचा सुलभीकरणाचा व टंकलेखनाचा मुद्धा आतां , म्हणजे ऐंशीएक वर्षांनंतर, कालबाह्य झालेला आहे.
– संस्कृत नियमांप्रमाणें, ‘अ + उ’ चा ‘ओ’ होतो ; तसेच ए, ‘अं’ , ‘अ:’ , वगैरे वगैरेंचें.
– ‘आ’ हें‘ अ’ चें दीर्घत्व आहे ( महाप्राण ). त्यामुळे , ‘अ + ा’ =आ हे योग्य आहे.
ई, ऊ, ऐ, औ हे असेच, दीर्घत्व असलेले स्वर आहेत.
– पण, इ. उ, हे वेगळे , separate, स्वर आहेत ( अ ची रूपें नव्हेत).
म्हणून त्यांना वेगळ्या खुणा लिपीत दिलेल्या आहेत. ( म्हणजेच , अि, अु वगैरे असें लिहिण्याची आवश्यकता नाहीं व तें योग्यही वाटत नाहीं ) .
(अर्थात्त्. योग्यायोग्यतेची चर्चा करण्याचा मला काय अधिकार ? पण अधिकारी व्यक्तींचेही हेंच मत आहे, असें वाचलेलें मला आठवतें ) .
– किर्लोस्कर वगैरे मासिकांमध्ये पूर्वी अि अु वगैरे लिहायचे , तो सावरकरांचा परिणामच.
– आपण ४० वर्षें याप्रकारें लिहीत आहात, हा सावरकरांचा परिणाम. त्यामुळेच, तुम्हाला salute !
स्नेहादरपूर्वक
सुभाष स. नाईक