पहिल्या पावसाची सरी धर्तीवर पडावी अन् सबंध आसमंत मातीच्या कस्तुरी गंधात न्हाऊन जावा.पावसाची वाट पाहणाऱ्या चातकाची तुष्णा शांत व्हावी ,उन्हाच्या तापाने सोकलेली झाले पावसाची सरी येताच टवटवीत झालेली ,असा संजीवनी देणारा पाऊस प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा .असा हा बहुरंगी पाऊस सृष्टीला फुलवणारा, लपून बसतो मनाच्या गाभाऱ्यात
थेंब पावसाचे झेलीतात ओंजळीत
चिंब चिंब भिजते मन
वार्यासवे डोलत फिरती
इवले इवले लुसलुशीत तृण
झाले हिरवे माळरान पाचूचे
जणू सृष्टीचा तो मंगल क्षण
आभाळ दाटून आलेलं ढगांची गर्जना विजांचे तांडव अशा निसर्गाच्या लोभस रूपातून थंडगार वाऱ्याची झुळूक यावी की धरती सुरू व्हावा पावसाचा वर्षाव माळरानात तिच्या कुशीत लपलेला बी अंकुर यावं डोंगर शिवारातून झरे वाहत जावे गवत वर येऊन वार्यासवे डोलू लागते. झाडे वेली पल्लवित झालेली पावसाच्या येण्याने माळरान हसू लागले ….पुराने ओथंबून वाहणारी नदी नाले पावसाच्या रिमझिम सर्यांमध्ये चिंब भिजून गेली बच्चेकंपनी यांचा तर वेगळाच पावसाचा आनंद असतो येरे येरे पावसा म्हणत शाळेतून घरापर्यंत ठोकलेली धूम… पावसाच्या येण्याने शाळेत मिळणारी सुट्टी ,तिचा आनंद फार वेगळा असतो असा हा जिव्हाळ्याचा पावसाळा .पावसाळा जणू निसर्गाचा एक वरदानच पावसामुळे निसर्गाला नवे पण येते .तो येतो मुराद आनंदाने त्यांच्या धुंदीत पण येताना मात्र घेऊन येतो नवचैतन्याचे गाठोडे …..सर्वांच्या सुखासाठी पाऊस हा फार खट्याळ आहे ..सर्वांनी चेष्टा करणारा ज्या वेळी घराबाहेर पडण्याआधी घेतलेली छत्री सहजच कोडी परत येते पण एखादे वेळी छत्री नसली की हा खट्याळ पाऊस आलाच पाहिजे तेव्हा तर खऱ्या अर्थाने त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि हे चिंब भिजलेले क्षण आठवणींचा खजिना बनतात पाऊस हा आठवणीत टिपणारा हलकेच अश्रूंनाही त्याच्याच बरोबर घेऊन जाणारा ..आपल्या सुख दुःखाचा साक्षीदार म्हणतो तो फुलवतो ओठी स्मित सुखाचे अन् पुसून जातो पाट अश्रूचे पाऊस हा आनंदाची पर्वणी घेऊन येतो. त्याच्या प्रत्येक क्षणात प्रत्येक थेंबात ममत्वचा ओलावा असतो. जो झाडे-वेली फुला-फळांना भरवतो फुलवतो हिरव्यागार झाडांच्या पानावर लपलेल्या थेंबांचा वर्षाव होतो. खोडाच्या ओंडक्यात लपलेली पाखरं पाऊस थांबताच बाहेर आलेली इकडून तिकडे उडू लागतात .पावसाच्या सरीत अर्ण्याता मोर नाचू लागतात आभाळातले काळे धावू लागले की रानातले मोरे झटकून पाहतात आपले शानदार देखने पिसारे , ढगांच्या काड्या गर्दीने आभाळ भरुन आलं की थेंब टपटप न्या आधीच अधीर झालेले गार गार वारा बेभान लावून लागलेला अशा क्षणी मोर ही भान हरवलेला तो फुलवतो आपला पाचूचा पिसारा अन् नाचतो रानात थुई थुई.
ढगांचा तो फुटला नाद आल्या सरीवर सरी
मखमल पिसारा फुलवून मोर वनी नृत्य करी
झुळझुळ वाऱ्यांचा फार सुसाट डोंगरातून वाही दरी
पावसाचे थेंब ते सुखाचे धरतीला तृप्त करी
पावसाळा हा विविधांगी रूपाचा, किलबिल नाऱ्या पाखराचा फुलांचा फळांचा, झुळझुळणार्या शुभ्र झऱ्यांचा, पहावी त्याचे सुंदर रूप डोळ्याच्या सुंदर पटलावर स्मृती म्हणून झळकतात
. सदैव राहणारे ढगाळ वातावरण अशातच सूर्याची पडलेली कोवळी किरण हिरव्या माळरानावर पडते. सूर्याच्या किरणांनी प्रकाशित झालेलं माळरान डोळ्याचं पारणं फेडते .कधीकाळी होणारा सप्तरंगी इंद्रधनुष्य सुदर्शन मनस्वार होऊन त्या झुल्यावर झुलावे , त्याचे रंग डोळ्यात साठवावे त्याने आकाशात धावणारे ढग पाऊस येण्याची सूचना करून जातात आणि यावे गार गार थेंबाची सरी कधीकधी घ्यावेसे वाटते जावेसे वाटते, ओंजळीत थेंब थेम्बाना झेलीत झेलीत खेळावेसे वाटते .त्या पावसात सवे हसत हसत येणारा पाऊस मनाला चिंब करून जातो आणि तोच पाऊस आठवणींचा महामेरू बनतो. पाऊस येतो पाऊस जातो आपण तेच असतो पण वेळ मात्र जात असते .कधी आनंदाचा वाटणारा पाऊस दुःखाचा होतो अन डोळ्यातील आठवणींचे थेंब टिपतो त्याच्या अस्तित्वाचा ओलावा तो तसाच दळून ठेवतो मनामनात . पावसाच रिमझिम रूप जिवाला वेड लावणारा असत आठवणीत तो आठवणींचे थेंब टिपतो पावसाच्या रिमझिम रूप जिवाला वेड लावणारा असतो म्हणूनच पाऊस सदैव लेखनाचा विषय असतो त्याचे सौंदर्य त्याचे मोठेपण कधीच पूर्ण लिहिल्या जात नाही .असा अनोखा वरदान म्हणजे पाऊस म्हणुनच पाऊस आला की ताज्या होतात आठवणी जिवंत होऊन फुलून जाते जीवन. आयुष्यात पाऊस चैतन्याचा संधीचे तो त्याच्या क्षणिक आयुष्यात ही जगण्यास प्रेरणा मिळते म्हणून पावसाची आतुरतेने वाट पाहण्यात येते पाऊस सदैव सदैव यावे तो आला की येतो सृष्टीला बहर त्याचं असणं तो आला की वसुंधरा हिरवा गार वाटते येथे नवेरुप जीवाला असते पाऊस येतो आनंदाचे गीत घेऊन सर्वांसाठी असा हा मनामनात आपल्या अस्तित्वाचा ओलेपणा पाऊस कोसळत राहतो रिमझिम रिमझिम………
— अॅड विशाखा समाधान बोरकर
पातूर जी अकोला
impressive expression