रीतसर कांदे पोहे आणि चहा
जेष्ठ लोकांच्या सोबत भेट ठरते पहा
चारचौघात दोघे बघतात एकमेकांना हळूच
मोठ्यांच्या समोर नजर भेट होते ती लाजून
दोघांना काहीतरी तिथेच क्षणात वाटतं
इथेच आपलं जुळाव हे मग जाणवत
थोडस दोघांत बोलून भेट ती संपते
होकार होतात दोघांत लग्नगाठ मग ठरते
आकर्षण स्पर्श ओढ दोघांनाही असते
लग्नानंतरचे नवीन दिवस मखमली बहरते
ती अहो म्हणते कारण ठरवून लग्न हे असते
त्यालाही तिचे गोड अहो म्हणणे मोहित करते
मखमली स्पर्शाचे दिवस आल्हाद सुरु होतात
एकमेकांना वेळ देतांना सवयीच्या खुणा अलगद कळतात
भांडण राग रुसवा वाद दोघांतही होतो
परी जेष्ठांच्या समजुतीने संसार फुलतो
हळूहळू ओळख होते एकमेकांना सारी
तीच मजा असते नातं हळुवार उलगडण्याची
दोघांच्या आवडी नव्याने दोघांना कळतात
रंगीबेरंगी फुलपाखरु मन दोघांची एक होतात
अलवार स्पर्श मोहक मिठी भावुक मन
सगळे हक्काने सहज दोघांत उलगडते
मिटल्या डोळ्यांत दोघांच्याची नाजूक
प्रेम अलगद ओथंबून तरळते
दोघेही सवयीने एकमेकांचे होतात
प्रेम नंतर करतात आणि संसार हलकेच सजवतात
असो लग्न लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज पवित्र नातं
हे लग्नगाठीतच बनतं
ठरवून केलेल्या लग्नात प्रेमही नक्कीच मोहरत
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply