नवीन लेखन...

रॉक द इंजिनिअरिंग





Rock the Engineering
बे एके बे , बे दुणे चार, बे त्रीक सहा ………. हा पाढा सगळ्यांनाच माहिती आहे व जोengineering ला येतो त्याला तर हमखाच माहिती असतो……कारण त्यावरच तर त्याचे अख्खे आयुष्य अवलंबून असतं. Engineering लहान मुलापासुन

तर मोठ्या माणसापर्यंन्त माहिती असलेला शब्द. हा आठ अक्षरी शब्द असला तरी त्याची किंमत ही दिवंसेदिवस लाखोच्या घरातून करोडोच्या घरात जाऊन पोहचलेली आहे .

भारतीय संस्कृतीमध्ये Doctor ला alternate पर्याय म्हणुन engineer या शब्दाकडे पाहिल्या जाते .हा शब्द तुम्हाला भारतीय शब्दकोशाशिवाय कुठेही सापडणार नाही आणि जर तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याचा अंश सुद्धा कोठेही मिळणार नाही…..आणि हो engineering मध्ये पर्याय ही अनेक ?? तुम्हाला कोणते engineerव्हायचे , ते माहित नसले तरी चालेल . कारण अहो आपण कुठलाही engineer व्हायला तयार ना ? मनासारखी branch मिळाली नाही ,म्हणुन आम्ही रडत बसत नाही , जी मिळाली ती आम्हचीच branch . हा पण college and university मात्र पाहतो , बर कां ? university आणि college सही मिळालं ना ? मग branch कुठलीही असो आम्हाला काही फरक पडत नाही , पहिले college and university महत्ताची बस…कारण colleges नुसार packages ठरतात ना ??? आणि टमक्या टमक्या collegeमध्ये तुम्हाला टमकी टमकी company job offer करायला येते ना ?? on the spot , campus through तुमच selection होत ना , मग जाँब मिळण्याशी मतलब ..that’s it …
तुमची branch गेली उडत… तुम्हाला काय व्हायचय याच्याशी काही संबंध नाही . तुम्ही जर मुलगा असाल तर engineer होणार आणि मुलगी असाल तर , doctor होणार आणि त्यामध्ये बोबडी वळली की मग
engineering ला दंडवत घालणारच …म्हणजे येऊन जाऊन आपण सगळे engineer चं.
ठीक आहे तर , तुम्ही engineer मग होणार , आता engineering चा अभ्यास करतायं म्हणजे engineer नाही तर काय चाकर होणार आहे??? Engineer झाला तरी त्याला पण पोटापाण्याचा प्रश्न हा असणारच , अहो तो पण सगळ्यांसारखा माणुसच आहे की??? पोटापाण्यासाठी नोकरी शोधणार ….हा ती पण foreign company मध्ये आधी शोधणार आणि नंतर काहीच हातात नाही मिळाल तर भारतीय company चा हात धरणार. कारण foreign company मध्ये नोकरी मिळाली तर आपला status वाढतो ना . आम्ही foreign company मध्येच job शोधणार , बरे का ? आणि महिन्याकाठी गलेगठ्ठ पगार घेणार …sorry ,sorry वर्षभरासाठी भारी package मिळवणार आणि भारत सरकारने offer केलेल्या Britishanchi चाकरी करतच राहणार…
भारत सरकारनं offer केलेल्या British company ची चाकरी करताना प्रत्येक वेळी स्वतःला

गुलामासारखं विका. एक कंपनी सोडुन दुसरी join करा आणि हजारो कागदप्रत्राच गाठोळं जमा करा . आणि ज्या कंपनीत job करायचयं आहे तेथे नेऊन ते आपटा….आणि स्वताःला गहाण टाका. Job सोडायचा म्हणजे पुन्हा ते गाठोळ एका सावकारापासुन सोडवून पुन्हा दुसऱ्या सावकाराकडे स्वताःला गहाण ठेवण्यासाठी सुपुर्द करा , एवढच आपलं काम . engineering मध्ये computer वाले डोळ्यांनी रडणार , तर civil वाले ऊनात तडपणार ,EN&TC वाले digital signal मध्ये अडकणार ,IT वाल्यांना virusखाणार आणि mechanical वाल्यांची डोके मशिनरी उडवणार . या सगळ्यातलं काहीच नाही जमलं तर , मग दोन पर्याय . पहिला :- एक तर घरी बसुन डोके दाबत बसणार किंवा दुसरा :- चुल्लुभर पाण्यात जाऊन जीव देणार . आपण दुसराच पर्याय निवडणार , कारण घरच्यांचे बोलणे खाण्यासाठी आपला जन्म हा झालेलाच नाही !!!!

ऊठ नालायका , नऊ वाजले college
ला जायच नाही का ????……… ” या आवाजात मला माझ्या mobile ने इशारा दिला आणि मस्तपैकी सुरु असलेल्या भाषणाच्या स्वप्न सभेतुन बाहेर पडलो आणि विचार करायला लागलो ’ तो तावा तावाने भाषण ठोकणारा माणूस कोण होता ?…….. ’ पुन्हा mobile ने त्याच शब्दांचा ऊच्चार करुन आमचा उद्धार केला , मग काही एक विचार नं करता college च्या तयारीला लागलो …..तरी पण सरते शेवटी एक प्रश्न उद्भवतो “ माझ्या स्वप्नातला engineering चा उद्धार करणारा तो माणुस कोण होता ??? ”………. जाऊ द्या यार तुम्ही पण आपल्या डोक्याचं दही करु नका आणि मी पण करत नाही कारण…….
“Doctor होऊन दुसऱ्याच्या जीवावर जगल्यापेक्षा,
वकील होऊन दुसऱ्याच्या भांडणावर स्वताःची पोळी भाजल्यापेक्षा,
Engineer होऊन स्वताःच्या पायावर धोंडा मारलेला काय वाईट ?”

— कुमार.अंकुश श्रीधरराव कावलकर उर्फ स्वानंद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..