नवीन लेखन...

रूम हिटर

आपल्या देशात अनेक ठिकाणी रूम हीटरची फारशी आवश्यकता भासत नसली तरी जिथे बर्फ पडण्याइतकी थंडी असते तिथे ते वापरावे लागतात. रूम हीटरला खरेतर स्पेस हीटर असे म्हणतात. बंदिस्त खोलीतील हवा उबदार करण्याचे काम हे यंत्र करीत असते. सेंट्रल एसी प्रमाणे सेंट्रल हिटिंग यंत्रणाही असते, त्यात अनेक खोल्यांतील हवा एकाच वेळी गरम केली जाते.

कनव्हेक्टिव्ह हिटरमध्ये विद्युत प्रवाहाने गरम होणारी कॉईल असते व तिची उष्णता हवेला मिळून हवा गरम होते. रॅडिएटीव्ह हीटर्समध्ये हॅलोजन हिटर्सचा समावेश होतो. त्यात उष्णतारोधक क्वार्टझ आवरणात टंगस्टन धातूचे वेटोळे बसवलेले असते. यात हॅलोजन बल्बसारखे काम केले जाते पण फरक एवढाच असतो की, ऊर्जा ही इन्फ्रारेड स्पेक्ट्रमच्या रूपात बाहेर पडत असते. पुरवलेल्या ऊर्जेच्या ८६ टक्के ऊर्जेचे रूपांतर यात प्रारण ऊर्जेत केले जाते. यात हवा गरम करत बसण्यापेक्षा आपल्या कपड्यांनाच उष्णता मिळते. जिथे उष्णता राखण्याची सोय नाही अशा खोल्यांना हे हॅलोजन हिटर्स योग्य असतात.

इलेक्ट्रीक रूम हीटरमध्ये नायक्रोम किंवा सेरॅमिकचा वापर केला जातो व उष्णता खोलीत पसरवण्यासाठी फॅनचा वापर केला जातो. यात उष्णतेचे चक्र चालवण्यासाठी हीट पंपचा वापर करून बाहेरची उष्णता परत आत आणली जाते. यात गॅस हिटर्सही असतात त्यात प्रोपेन, ब्युटेन किंवा एलपीजी यांचा वापर केला जातो. यात कार्बन मोनॉक्साईड वायू हा इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे अधिक हवेशीर खोल्यांनाच असे हिटर वापरतात. इलेक्ट्रीक हिटरमुळे आगी लागण्याचा धोका असतो त्यामुळे त्यांची काळजी घ्यावी लागते.

असे असले तरी गॅस हिटरपेक्षा तुलनेने ते काहीसे सुरक्षित असतात, त्यांचा खर्चही कमी असतो. रूम हीटर घेताना त्यात चांगल्या दर्जाचा फॅन आहे की नाही. खोलीची तापमान पातळी नियंत्रित करण्यासाठी थर्मोस्टॅट आहे की नाही, सेन्सर आहे की नाही हे बघून घ्यावे. इलेक्ट्रीक हीटरच्या वायरींचा दर्जा नेहमी चांगला असला पाहिजे.

१९०० च्या सुमारास डब्ल्यू.एल.शेयू या तरूणाने कॅलिफोर्नियात ऐन थंडीत गॅस हीटर चालवून दाखवला होता. त्यानंतर चार्लस एमिली ऑलेट यांनी पहिल्यांदा घरात वापरता येण्यासारखा रूम हीटर तयार केला. एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येण्यासारखे पोर्टेबल रूम हीटर्सही मिळतात पण ते शक्यतो वायू इंधनावर आधारित असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..