नवीन लेखन...

वंशभेदाचा सामना करणारी रोझा पार्क्‍स

तुम्‍ही मशाल हाती धरा, लोक तुमच्‍यामागे चालु लागतील – रोझा पार्क्‍स

रोझा पार्क्‍स चा जन्‍म 4 फेब्रूवारी 1913 रोजी अलाबामाच्‍या तुस्‍केजी येथे झाला होता. रोझा जशी मोठी होत होती तसे कृष्‍णवर्णीयांना मिळणा-या दुय्यम वागणुकीबाबतची तिची जाणीव अधिकाधिक प्रगल्‍भ होत चालली होती. दररोजच्‍या व्‍यवहाराने कृष्‍णवर्णीयांना अगदी तुच्‍छतेने वागवले जात असे. कृष्‍णवर्णीय असल्‍यामुळे रोझाला देखील वंशभेदाचे चटके सहन करावे लागत होते.

1932 साली रोझाचा विवाह रेमण्‍ड मार्क्‍स बरोबर झाला. तो मॉन्‍टगोर्स येथे न्‍हावीकाम करत असे. तसेच NAACP (द नॅशनल असोसिएशन फॉर द अॅडव्‍हांन्‍समेंट ऑफ कलर्ड पिपल)  चा सक्रीय कार्यकर्ता होता. रोझा देखील आपल्‍या पतीबरोबर कृष्‍णवर्णीयांच्‍या हक्‍कासाठी काम करु लागली. यानुषंगाने होणा-या विविध सभांना ती आवर्जुन हजर राहात असे.

रोझा मॉन्‍टगोमरी फेअर डिपार्टमेंट स्‍टोअर मध्‍ये काम करत असे. त्‍यादिवशी गुरुवार होता. तारिख होती 1 डिसेंबर 1955, संध्‍याकाळचे सहा वाजले होते. रोझा आपल्‍या घराकडे परत जायला निघाली. ती ‘क्‍लेव्‍हलॅण्‍ड अव्‍हेन्‍यु बस’ मध्‍ये चढली. तीने कंडक्‍टरला तिकीटाचे पैसे दिले, तिकीट घेतले. बसमध्‍ये काळया आणि गो-या लोकांकरीता बसण्‍याच्‍या जागा ठरवून देण्‍यात आल्‍या होत्‍या. पुढच्‍या दहा सिट आसने गो-याकरीता राखिव होत्‍या. गो-याकरीता राखीव असणा-या दहा सीट सोडून त्‍याला लागून असणा-या अकराव्‍या क्रमाकांच्‍या सीटवर रोझा जावून बसली तीची सीट ही साधारणत: बसच्‍या मध्‍यभागी होती.

मॉन्‍टगोमरीने शहराकरीता असा अध्‍यादेश जारी केला होता की, बसमध्‍ये काळया आणि गो-या लोकांकरीताची आसने वेगवेगळी असावीत. कोणी कुठे बसावे हे सांगण्‍याचा अधिकार कन्‍डंकंटरला देण्‍यात आला होता. खरे पाहिले तर गोरा व्‍यक्‍ती आल्‍यावर कृष्‍णवर्णीय व्‍यक्‍तीने त्‍याला आपली सीट खाली करुन अशी तरतुद कोठेही नव्‍हती. परंतु मॉन्‍टगोमर्स मधील बस कंडक्‍टर कृष्‍णवर्णीय प्रवाशाला सीट खाली करुन दयायला सांगत. कृष्‍णवर्णीय लोक तो आदेश मुकाटयाने पाळत. आता तरी पदधतच रुढ झाली होती.

रोझा ज्‍या बसमध्‍ये बसली होती ती बस लवकरच भरली. गो-या लोकांकरीता असणा-या सर्व आसनांवर गोरे लोक स्‍थानापन्‍न झाले. बसमध्‍ये आणखी काही गोरे लोक चढले. रोझाची सीट गो-या लोकांच्‍या सीट मागेच होती. त्‍या सीटवर रोझासह एकुण चार कृष्‍णवर्णीय लोक बसले होते.बस कन्‍डक्‍टरने त्‍यांना गो-या लोकांकरीता सीट खाली करायला सांगितली. रोझाला वगळता उरलेले कृष्‍णवर्णीय लोक सीटवरून उठले. त्‍यांनी गो-या लोकांना बसायला जागा करुन दिली. पण रोझा उठली नाही. बस कंडक्‍टरने तीला पून्‍हा उठण्‍याबाबत सुचना केली तरीही ती उठली नाही. रोझाने गो-या लोकांकरीता सीट मोकळी करुन देण्‍यास ठाम नकार दिला. रोझाने फार मोठे पाऊल उचलले होते. बसमधील गोरेलोक तिला मारहाण करु शकत होते. पोलीस तिला अटक करू शकत होते. पण रोझा आपल्‍या निर्णयावर ठाम राहिली. तीने आपली सीट सोडली नाही. शेवटी बस कंडक्‍टरने पोलिसांना बोलावले. पोलीसांनी रोझाला अटक केली. मॉन्‍टगोमरी सीटीकोडच्‍या चॅप्‍टर 6 मधील कलम 11 च्‍या भंग केल्‍याचा आरोप तिच्‍यावर लावण्‍यात आला. तिला पोलीस मुख्‍यालयात नेण्‍यात आले तेथे रात्रीच्‍या वेळी तीची जमानतींवर सुटका करण्‍यात आली.

रोझाला अटक झाल्‍याचा निषेध म्‍हणून मॉन्‍टगोमरीमधील कृष्‍णवर्णीय एकत्र आले. त्‍यांनी मॉन्‍टगोमरीच्‍या सीटी बसेसवर बहिष्‍कार टाकण्‍याचे ठरविले. तशा आशयाची पत्रके छापून जागोजागी वाटण्‍यात आली. 5 डिसेंबर 1955 रोजी रोझाच्‍या प्रकरणावर कोर्टात सुनावणी होणार होती. त्‍यावेळी कृष्‍णवर्णीय लोक मोठया सख्‍येने गोळा झाले.

रोझा प्रकरणामुळे कृष्‍णवर्णीय लोकांनी सीटी बसेसवर बहिष्‍कार टाकला. लोक कामाच्‍या जागी पायी जावू लागले, घरुन काम करु लागले किंवा टॅक्‍सी शेअर करुन जावू लागले.

दिनांक 5 डिसेंबर 1955 रोजी मान्‍टगोमरीमधील कृष्‍णवर्गीय लोक माऊंट झियान चर्च येथे एकत्र जमले. त्‍यांनी बहिष्‍काराचा लढा अधिक तिव्र करण्‍याचे ठरविले. त्‍यासाठी त्‍यांनी मॉन्‍टगोमरी इम्‍प्रोव्‍हमेंट असोसिएशनची स्‍थापना केली. मॉन्‍टगोमरीमध्‍ये नव्‍यानेचे आलेले डॉ. मार्टीन ल्‍युथर किंग ज्‍युनिअर यांची नेता म्‍हणून निवड करण्‍यात आली.

मॉन्‍टगोमरीच्‍या सीटी बसेसवरील कृष्‍णवर्णीयांचा बहिष्‍कार तब्‍बल 381 दिवस चालला. मॉन्‍टगोमरीमध्‍ये सुमारे 40 हजार कृष्‍णवर्णीय राहतहोते. ते दिवसाला 20-20 मैल पायी चालत जात परंतु सीटी बसमध्‍ये चढत नव्‍हते.  त्‍यामुळे मॉन्‍टगोमरीच्‍या सीटी बसेस रिकाम्‍या राहु लागल्‍या. बस चालविणा-यांचा धंदा तोटयात जावू लागला. आता गोरे लोक आणखीच चिडले. त्‍यांनी कृष्‍णवर्णीयांवर हल्‍ले करायला आणि जाळपोळ करायला सुरुवात केली. कृष्‍णवर्णीय लोकांच्‍या चर्चला आगी लावण्‍यात आल्‍या. त्‍यांचे नेते मार्टीन ल्‍युथर किंग ज्‍युनियर आणि इ.डी.निक्‍सन यांची घरे गो-या लोकांनी बॉम्‍बस्‍फोट करून उध्‍वस्‍त केली.

रोझा पार्कच्‍या प्रकरणात तिला दहा डॉलर दंडाची शिक्षा झाली. प्रश्‍न दंडाचा नव्‍हता. तर तत्‍वाचा होता. कृष्‍णवर्णीयांची लढाई वंशभेदाविरुध्‍द होती. कृष्‍णवर्णीयांनी वांशिक भेदाभेदाविरूध्‍द आलाबामाच्‍या डिस्ट्रिक्‍ट कोर्टात केस दाखल केले. रोझाचा वकील फ्रेड ग्रे याने या कामी पूढाकार घेतला. जून 1956 मध्‍ये डिस्ट्रिक्‍ट कोर्टाने कृष्‍णवर्णीयांना दिल्‍या जाणारी वागणूक बेकायदेशिर ठरविली. मॉंटगोमरी सीटीने या निर्णयाविरूध्‍द अपिल केले. 13 नोव्‍हेंबर 1956 रोजी अमेरिकेच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाने जिल्‍हा न्‍यायालयाचा निर्णय बरोबर ठरवून वांशिक भेदाभेद बेकायदेशिर  असल्‍याचा बाबीवर शिक्‍कामोर्तब केले.

रोझा पार्कने उठविलेल्‍या आवाजामुळे वांशिक भेदाभेदाविरूध्‍द लढाई पेटली या संपुर्ण कालावधीत ती कृष्‍णवर्णीयांच्‍या न्‍यायाकरीता लढत होती. 1992 साली रोझा पार्कने रोझा पार्क्‍स – माय स्‍टोरी हे आपले आत्‍मचरित्र प्रसिध्‍द केले. रोझा पार्क्‍सला स्प्रिगर्न मेडल, मार्टिन ल्‍युथर किंग, ज्‍यु अवार्ड टु पुरस्‍काराची सन्‍मानित करण्‍यात आले. 9 सप्‍टेंबर 1996 रोजी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बिल क्लिंटन यांनी प्रेसेंडेशीयल मेडल ऑफ फ्रीडम ने रोझाला सन्‍मानित केले. वयाच्‍या 92 व्‍या वर्षी 24 ऑक्‍टोंबर 2005 रोजी रोझाचे निधन झाले. तेव्‍हा तिच्‍या अंत्‍यदर्शनाला 50 हजारापेक्षा जास्‍त लोक गोळा झाले होते.

अन्‍यायाविरूध्‍द आवाज उठवा, तुम्‍ही मशाला हाती धरा लोक तुमच्‍या मागे चालू लागतील ही प्रेरणा रोझा पार्क्‍सकडून निश्चितच घेण्‍यासारखी आहे.

 — लेखक : राजेश खवले

राजेश खवले हे अकोला येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. हा लेख अखंड महाराष्ट्र चळवळ या WhatsApp ग्रुपमधून घेण्यात आला आहे.

Posted by – शेखर आगासकर

 

1 Comment on वंशभेदाचा सामना करणारी रोझा पार्क्‍स

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..