नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग १६

राघवने सकाळचा ब्रेकफास्ट उरकला. आणि मोबाईल उचलला.
“हॅलो, जॉन! राघव हियर !”
“गुड मॉर्निंग सर!”
“जॉन, अजून दहा मिनिटात म्हणजे बरोबरसाडेनऊला भोसेकर चाळीच्या कोपऱ्यावर येतोय! तू गेटवर थांब! ”
“सर, मी आसपासच आहे! मनोहर साठी येताय ना? पण तो काल रात्री आलेलाच नाही!”
“मला माहित आहे! आणि तो येणार हि नाही!”
“का?”
” कारण तो कालच ऍक्सीडेन्टमध्ये मेलाय! ”
या राघवाल सगळ्याच गोष्टी ऍडव्हान्समध्ये कशा कळतात? ओन्ली गॉड नोज! जॉनला राघवने पुन्हा एकदा चकित केले होते!
राघव आणि जॉन भोसेकराच्या चाळीतील मनोहरच्या खोलीकडे निघाले. राघवच्या बुटाच्या आवाजाने चाळीतील रिकामटेकडे बघ्यांची झुंबड उडाली. या चाळीला अनेक थोरा मोठ्यांचे पाय लागले होते. पण पोस्टमन शिवाय ‘खाकी’ वर्दीवाले कोणीच आले नव्हते. आज पोलिसांच्या आगमनाने चाळ पावन झाली होती!
बघ्यांची गर्दी वाढत होती. जॉनने दाखवलेले मनोहरच्या खोलीचे दार फक्त लोटलेले होते.
” या खोली शेजारी कोण राहतंय?” राघवच्या या वाक्यासरशी जदूची कांडी फिरवावी तशी बघ्यांची गर्दी गायब झाली. लोक पोलिसांशी सहकार्य करणे सोडाच पण साधे बोलायला देखील नाखूष असतात. याची प्रचिती राघवला अनेकदा आली होती.
“जॉन, जरा चौकशी कर,शेजारी कोण राहतंय? मनोहर कोठून आला? म्हणजे त्याचे गाव कोणते? त्याचे येथे मुंबईत कोण -कोण नातेवाईक आहेत? थोडक्यात जमेल तितकी माहिती काढ! तोवर मी घरात  नजर टाकतो. ”
राघवने दोन्ही हातानी ते लोटलेले दार उघडून मनोहरच्या खोलीत प्रवेश केला. सगळे घर अस्ताव्यस्त पडले होते. एकुलते एक कपात ‘आ’ वासून पहात होते. त्यातले सगळे कपडे एक एक सुटे करून घरभर पसरले होते. लोखंडी पत्र्याची पेटीचे झाकण मोडून टाकले होते. पलंगावरल्या गादी उशीचे तर पोस्टमोर्टमच झाले होते. आतला कापूस, चिंध्या धिटाईने बाहेर डोकावत होत्या. इतकेच काय? डाळ – तांदळाचे आणि चहा-साखरेचे डब्बे पण धारा तीर्थी पडले होते! कोणी तरी छत आणि भिंती सोडून सगळी खोली मायक्रोस्कोप खाली तपासून काढली होती! कोणी तरी, काहीतरी, या खोलीत शोधात होते? कोण? आणि काय? उघड्या कपाटाच्या कोपऱ्यातल्या फटीत काही तरी अडकलेले राघवला दिसले त्याने ती वस्तू अलगद ओढून बाहेर काढली. ती एक प्लॅस्टिकची झिप लॉक असलेली छोटीशी पुडी होती. अस्सल गांजाची! अशीच पुडी जसवंतच्या आऊट हाऊस मध्ये पण सापडली होती! मनोहर जसवंतला ‘माल’ पुरवत होता? कदाचित अशाच गांजातून जसवंतला विषबाधा झाली असावी. मनोहरने जसवंतचा काटा काढला असे सूचित करणारा हा पुरावा होता!
०००
अनपेक्षितपणे तो बुटका टकलू ढाब्यातून वेगाने धावत हायवे कडे पळत होता, त्याच्या मागे राघव होता. क्षणात त्या बुटक्याला चिरडून तो राक्षसी ट्रक निघून गेला होता. रुद्राला हे नाट्य तो उभा होता तेथून दिसत होते. मेंदूने या सर्वांचा अर्थ लावेपर्यंत काहीवेळ तो एका जागी स्तब्ध उभा राहिला. या अपघातून तो बुटका वाचणे शक्यच नव्हते. रुद्राने डोक्यावर हेल्मेट घातले आणि आपल्या स्पोर्ट्स बाईकला स्टार्ट केले. तो रस्त्याला लागला तेव्हा त्याच्या गाडीचा स्पीडोमीटर तीन अंकी आकडा दाखवत होता! पण त्याचे डोके त्या पेक्षाही वेगाने काम करत होते. ते पाच फुटी माकड मेल होत! तरी रुद्राला फासा पर्यंत नेणार ते रेकॉर्डिंग त्याच्या जवळच होते! त्याचा मोबाईल राघवच्या हाती लागला तर? तर फारसे बिघडणार नव्हते. कारण त्यातल्या क्लिप मध्ये रुद्राचा चेहरा दिसत नव्हता. आणि संपूर्ण रेकॉर्डिंग मोबाईवर असण्याची शक्यता खूप कमी होती. अन असली तरीराघव रुद्रा पर्यंत पोहचण्यास काही काळ नक्कीच लागणार होता! तो बुटका ढाब्यात आला तेव्हा मोबाईलवर बोलताना रुद्राने पहिले होते. अश्या जबरदस्त अपघातातून मोबाईल सही सलामत सापडणे, म्हणजे चमत्कारच म्हणावा लागला असता. राघव अपघाताच्या स्पॉटवर होता. काही प्रमाणात तो अपघाताला कारणीभूत पण होता. बॉडी ऍम्ब्युलन्स मध्ये जायी पर्यंत राघव गुंतणार होता! शिवाय लगेच तो बुटक्याच्या घरा पर्यंत पोहंचणार नव्हता! तेव्हा हीच वेळ होती, त्या बुटक्याच्या घराची तपासणी  करण्याची!
रुद्राची बाईक भोसेकर चाळीकडे वळली!

— सुरेश कुलकर्णी 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..