हा गर्भ एक पावन उदरातला
तो कोण ? कुणा कळला नाही
जन्मदात्यांचेच ऋण आजन्मी
तेच ब्रह्मरुप ईश्वरी , दुजे नाही….।
त्यांना पुजावे, त्यांनाच भजावे
श्रद्ध्येय भक्तीप्रीती दुजी नाही
पान्हा मातृत्वी वात्सल्यपुर्तीचा
पितृत्वासम, दुजा आधार नाही….।
जन्मदाते! सर्वश्रेष्ठ या जगती
तिथेच नमावे अन्य कोठे नाही
पापपुण्यकर्म हिशेब चित्रगुप्ती
तिथे तर कुणाची सुटका नाही….।
तो जो कोण अनामिक अतर्क्य
जन्मदात्यांहुन श्रेष्ठ असत नाही
जन्मदात्यांचेच ऋण आजन्मी
तेची ब्रह्मरूप ईश्वरी, दुजे नाही….।
रचना क्र. ६१
२८/६/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908
Leave a Reply