नवीन लेखन...

रशियन टेनिस स्टार अ‍ॅना कुर्निकोव्हा

जन्म. ७ जून १९८१

अ‍ॅना कुर्निकोव्हाची गणना सर्वाधिक ग्लॅमरस खेळाडूंमध्ये होते. वयाच्या १५ व्या वर्षीपासूनच तिचे लाखो चाहते आहेत. एकही सिंगल्स किताब जिंकू न शकलेली अ‍ॅना तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत होती. अर्थात डबल्सची दोन ग्रँडस्लॅम तिच्या नावावर आहेत.

अ‍ॅना कुर्निकोव्हा ही १९९० आणि २००० च्या दशकातील सर्वाधिक चर्चित प्लेयर होती. तिने कधीच एखादे मोठे अ‍ॅनाने मार्टिना हिंगिससोबत दोन ग्रॅन्ड स्लॅम टायटल जिंकले होते. २००० मध्ये ती डबल्समध्ये पहिल्या स्थानावर होती. त्यामुळे ती टेनिसच्या जागतिक क्रमवारीत काही वर्षापूर्वी ८ नंबरवर पोहोचली होती.

अ‍ॅना कुर्निकोव्हाने पॉप स्टार एनरिकशी लग्न केले. या जोडीला जुळे अपत्य आहे. यापूर्वी अ‍ॅनाचे आईस हॉकी प्लेयर सर्जेई फेडेरोसोबत लग्न झाले होते, परंतु नंतर घटस्फोट घेतला. अनेक मासिकाच्या कव्हरसाठीही तिने फोटोशूट केलेले आहे. २००७ मध्ये टेनिस वर्ल्डचा निरोप घेतलेल्या अ‍ॅना कुर्निकोव्हाने एका अंडरगारमेंट्स कंपनीसाठी जाहिरात केली आहे.

आपल्या खेळासोबतच अ‍ॅना नेहमी स्टाइल आणि ग्लॅमरस इमेजमुळे जास्त चर्चेत राहत होती. एकेकाळी विम्बल्डन दरम्यान तिच्या ड्रेसमुळे भरपूर वादंग निर्माण झाले होते. विम्बल्डनला रॉयल टूर्नामेंट मानले जाते आणि यामुळे तिने परिधान केलेला ड्रेस मान्य नव्हता. तरीही आजही तिची गणना मोस्ट स्टाइलिश टेनिस प्लेयर्समध्ये केली जाते.

अ‍ॅना कुर्निकोव्हाचे टेनिस करिअर.

– ग्रँड स्लॅम : ऑस्ट्रेलियन ओपन (1999, 2002)
– टूर फाइनल्स (डबल्स) : 1999 आणि 2000
– सिंगल मध्ये 209 सामने खेळले आणि 129 जिंकले.
– डबल्स मध्ये 200 सामने खेळले आणि 71 जिंकले.

संजीव  वेलणकर
९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..