किती रात्री अशाच जागवल्या, राजसा तुझ्या स्मृतींमध्ये,
वाट पाहताना जीव थकला,
मन चिंतातूर आतमध्ये,—
सारखे हे काळीज उले,
चंद्र उगवे हा डोईवरी,—
का सवतीने वाट अडवली,
मोहात पाडत तुला सत्वरी,–!!!
कितीक दिन होऊन गेले,
ना निरोप कसला संदेश,
तू गेल्यावर भोवताली,
वाटे हा परकाच प्रदेश ,–!!!
भोवती आहेत नाती सारी,
आवडते ही मज सासुरवाडी,
राम नाही पण त्यात कुठला ,
एकली भासते मी संसारी,–!!!
रामरगाडा अवती असता,
सांगाया कोणास जावे ,
दुःख तुझ्या विरहाचे रे,
कोणापाशी मोकळे बोलावे,–!!!
आता येईल जीवा बेचैनी,
कसे त्यास रमवावे,
डोळे लावून बसू किती,
दूर तू त्या परागणी,–!!!
नसते तुला कधीच चिंता,
घरच्या आपल्या माणसांची,
ते सगळे मात्र जीव टाकती,
कशी तुझी बेपर्वा वृत्ती,–!!!
मनमोर माझा नाचेल खरा,
जेव्हा कधी येशील तू ,–
इतरांसाठी असेल ग्रीष्म, माझ्यासाठी फुलेल ऋतू –!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply