साद देते हलकेच सख्या
प्रतिसाद तू आल्हाद दे,
तप्त मोहरली अधर काया
तू मिठीत अलवार मज घे
मोहरेल अंग अंग माझे
स्पर्श तुझा मलमली होता,
घे बिलगून सख्या मज तू
गांधळेलं तुझी अधर काया
ओठ माझे रसिलें मादक गुलाबी
घे अलवार चुंबनी तू ओठ पाकळ्या,
धुंद होते सर्वांग माझे जरासे
तृप्त हो तू हलकेच माझ्यात असा
हा प्रणय खेळ मोहक सारा
जीव गुंततो नकळे काही मना,
तू ओढशील मज मिठीत तुझ्या
लाजेल मी तेव्हा पुन्हा पुन्हा
दाटते उरात मुलायम भाव हा
समर्पित होते मी अलवार तुझ्यात,
लाज सोडून येते मी सख्या अशी
हृदयात मिटून घे तू माझ्या पाऊलखुणा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply