साद येता माहेरची
याद ही वृंदावनाची
कानी गाज घुंगराची
मन जाई माहेरी ।।१।।
धाव घेई माहेरासी
भेटू आता भावंडासी
गुज गोष्टी मैत्रिणीसी
साधले हितगुज ।।२।।
माय माझी प्रितझरा
बाप घाली येरझारा
लेक दिसे उभी दारा
मायेचा वाहे झरा ।।३।।
भाऊ अजय,विजय
आहे गुणी भावजय
आला धावत सुजय
भाचा आहे हुशार ।।४।।
चार दिसाचे माहेर
आई करते आहेर
बग्गी उभी बाहेर
नेण्या आले धनी गं ।।५।।
— सौ माणिक शूरजोशी
नाशिक
ओवी
८-८-८-७
Leave a Reply