नवीन लेखन...

साजूक तूप समज आणि गैरसमज

तूप खाल्ले की जाडी वाढते असा एक समज आपल्याकडे आहे. अतिशय योग्य आहे मात्र कोणते तूप? साजूक तूप कि वनस्पती तूप? दोन्ही तुपातील नेमका फरक समजून घेऊ.

१)  वनस्पती तूप: हे तूप कसे तयार करतात याची माहिती अनेकांना नाही. वनस्पती तूप म्हणजे hydrogenated vegetable oil  हे कसे तयार करतात? निकेल अथवा प्लँटीनम धातूच्या संपर्कातून हायड्रोजन वायू खाद्य तेलात मिसळतात. (याचा शोध युरोपात लागला आहे हा प्रकार भारतीय नाही.) हे केल्यावर तेल घट्ट होते आणि तुपासारखे दिसते म्हणून त्याला आपण वनस्पती तूप म्हणतो.

२)  साजूक तूप गायीच्या अथवा म्हशीच्या दुधापासून दही ताक लोणी तयार करून ते कढवून साजूक तूप तयार केले जाते. बाजारात मिळणारे साजूक तूप हे दुधातून क्रीम वेगळे करून कढवून म्हणजेच त्यातील पाण्याचा अंश काढून टाकून तयार केलेले असते.

जेव्हा आपण वनस्पती तूप खातो तेव्हा प्रत्यक्षात आपण तेल खात असतो. त्यामुळे फ्याट/जाडी वाढते हे नक्की. मात्र जेव्हा साजूक तूप खातो  तेव्हा जाडी मुळीच वाढत नाही उलट साजूक तुपामुळे आतड्यांना आवश्यक मऊ पणा येतो. चयापचय क्रिया सुधारते.

एक गोष्ट लक्षात घ्या साजूक तूपाचा शोध आपल्या पूर्वजांनी लावला आहे युरोपियन लोकांनी नाही.

साजूक तुपाचे उपयोग:

१)   सर्दी झाली कि नाकात तूप सोडतात. याने नाक मोकळे होते. नाकातील हाड वाढले तर तूप जरूर सोडावे नक्की फायदा होतो.

२)   साजूक तूप खाल्ल्याने पोटातील व्रण (अल्सर) बरे होतात.

३)  गायीच्या तुपाने पोटातील कॅन्सर बरा व्हायला मदत होते.

४)  पोटात आग होत असल्यास साजूक तुपाचा फायदा होतो.

५)  सुंठ साखर आणि साजूक तूप खाल्ल्याने जुलाब थांबतात.

६)   एक चमचा तूप व दोन चमचे मध अथवा दोन चमचे तूप आणि एक चमचा मध (व्यस्त प्रमाण महत्वाचे) हे अतिशय उत्तम टॉनिक आहे.

७)   साजूक तुपाने उष्णतेचे विकार बरे होतात.

८)   आतड्यांना वंगण होते. त्यामुळे पोट साफ होते व पाचक रसांची निर्मिती चांगली होते.

९) साजूक तुप खाल्याने नजर सुधारायला उपयोग होतो.

प्रयोग : एक चमचा साजूक तूप व एक चमचा साखर एकत्र करून खावे आणि वरून कपभर कोमट पाणी प्यावे. असे रोज सकाळी शक्यतो अनाशा पोटी व रात्री झोपण्यापूर्वी करावे. हा प्रयोग सलग ७ दिवस करून वजनातील फरक जरूर बघावा.

मधुमेही लोकांनी साजूक तूप नुसते खावे आणि वरून कोमट पाणी प्यावे. मात्र पाण्यात तूप घालून खाण्यापेक्षा वरून कोमट पाणी प्यावे हे उत्तम.

अनुभव:

१)  १९६५ साली मला पोटात खूप दुखत होते. अल्सर होता. आईने मला एका वैद्यांकडे नेले. त्यांनी मला दररोज ४ टेबल स्पून साजूक तूप खाण्यास सांगितले. मी १५ दिवस केल्यावर चांगला फरक जाणवला. तेव्हा पासून आजपर्यंत मी रोज ४ टेबल स्पून साजूक तूप नियमितपणे खातो. त्या नंतर मला पोटाचा त्रास कधीही झाला नाही. माझे वजन एकदम नॉर्मल आहे आणि जाडीही वाढली नाही.

२)  एक पेशंट माझ्याकडे आल्या. २५ वर्षे अँसिडीटीचा त्रास आहे असे सांगितले त्यांना तूप साखरेचा प्रयोग सांगितला दुसऱ्याच दिवशी त्यांनी चांगला फरक पडल्याचे सांगितले.

३)   माझ्या एका मद्रासी मित्राच्या बहिणीला तूप साखरेचा प्रयोग सांगितला. तिला संडासला साफ होत नव्हते. काहीही खाल्ले तरी उलटी व्हायची. अन्नावरची इच्छा उडाली होती. एक महिन्याने तिने मित्राला फोन करून सांगितले कि साजूक तूप हे अमृत आहे. त्याने मला खूप फायदा झाला आता मी सगळे काही खाते.

४)  माझ्या मुलाला रात्री अँसिडीटीमुळे झोप येत नसेल तर दोन चमचे नुसतेच साजूक तूप खातो त्यामुळे त्याला शांत झोप लागते.

५)   हा प्रयोग आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी केला आहे त्या सर्वांनाच फायदा झाला आहे. कोणाचेही वजन वाढले नाही.

आपल्याला काहीही शंका असल्यास मला जरूर विचाराव्यात.

डॉ.अरविंद जोशी
९४२१९४८८९४

(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..