ताल नाही तंत्र नाही
जिभेवर नाही ताबा
उठले सुटले भाषण देती
शेतकऱ्यांनाच दाबा
कापूस गेला तुर गेली
कोणीच देईना भाव
“साले”म्हणून शिव्या देती
असे का करता राव?
आम्ही पिकवतो तुम्ही खा
तक्रार आमची नाही
चूल पेटेल एवढेच द्या
जास्त तर मागत नाही
मोठी झाली लग्नाची
लहान बारावी पास
तुरीला मिळेल भाव तर
काम जमेल हो खास
कर्जाचा हा डोंगर मोठा
मी कोसळून जाणार नाही
संकटाला घाबरून भाऊ
गळफास घेणार नाही
एक वात हिमतीची मी
कष्टाने पेटविलं पुन्हा
काळ्या आईच्या कुशीत
बीज उगवून दाखवील तुम्हा
सत्काराचे चार शब्द
कधीतरी आम्हा बोला
भूमिपुत्र म्हणायचा तो
कधिच काळ गेला
कष्टाचे चारच रुपये
वर टीप देऊ नका
जमलं तर दोन हाना
पण “साले”म्हणू नका
रचना-रमाकांत द.मांढरे।
9657356696
Leave a Reply