लोचनी सांजवात आठवांची
झाली व्याकुळ कावरी बावरी…
तव निर्मली रूपात मी हरवलो
सांगना कसा परतु मी माघारी…
तुच लाविलास जीवास जीव
ओथंबुनी, ओघळतेस अंतरी…
आत्म्यास जाणवतो स्पर्श तुझा
हे सत्य मौनी कवटाळीतो उरि…
हुरहुर ती, हरएक क्षण सोबती
जगविते लोभस संध्याकिनारी…
होता नि:शब्द , वादळ अंतरीचे
मग हॄदयी, घुमते हरिची बासुरी…
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५४
१०/१०/२०२२
Leave a Reply