खेळाच्या त्या मैदानीं,
रंगात आला खेळ,
मुरलेले खेळाडू,
आनंदी जाई वेळ ।।१।।
खेळाच्या कांहीं क्षणी,
टाळ्या शिट्या वाजती,
आनंदाच्या जल्लोषांत,
काही जण नाचती ।।२।।
निराशा डोकावते,
क्वचित त्या प्रसंगीं,
हार- जीत असते,
खेळा मधल्या अंगी ।।३।।
सूज्ञ सारे प्रेक्षक,
टिपती प्रत्येक क्षण,
खेळाडू असूनी ते,
होते खेळाचे ज्ञान ।।४।।
मैदानी उतरती,
ज्यांना असे सराव,
जीत त्यांचीच होते,
ज्यांच्यात खिलाडू भाव ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply