नवीन लेखन...

सात आश्चर्ये

एका शाळेमध्ये एकं शिक्षिका आपल्या वर्गातल्या मुलांना जगातील सात आश्चर्ये काय आहेत ते लिहायला सांगते. सगळी मुले बहुतांशाने अशी यादी बनवतात.

१. ग्रँड कॅनियन
२. ग्रेट वॉल ऑफ चायना
३. पनामा कॅनाल
४. ताज महाल
५. एम्पायर स्टेट बिल्डींग
६. पिरामिडस ऑफ इजिप्त
७. सेंट पिटर्स बॅसिलिका

सगळ्या मुलांच्या वह्या तपासून झाल्यावर शिक्षिकेच्या लक्षात येते की त्यातल्या एका मुलीने अजून आपली वही सादर केलेली नाही. ती त्या मुलीकडे बघते. ती मुलगी अजूनही मनापासून आपल्या वहीत काहीतरी लिहित असते.

शिक्षिका तिला विचारते “तुझे काही अडले आहे काय? तुला मदत हवी असेल तर मी करते.” शिक्षिकेला वाटते की हिला सगळी सात नावे आठवत नसतील. ती मुलगी लाजरी असते. ती मानेनेच नकार देत म्हणते “या जगात एवढी आश्चर्ये आहेत की मी सातच नावे लिहून त्यात सगळ्यांना कशी सामावणार? ”शिक्षिका तिला म्हणते “ जे लिहिले आहे ते मला दाखव. वाचूनच दाखव. इतरांनाही कळू दे तू काय विचार केला आहेस.”

मुलगी वाचू लागते.
१. स्पर्श
२. श्रवणशक्ती
३. दृष्टी
४. सुगंध घेण्याची शक्ती
५. चव घेण्याची शक्ती
६. हसण्याची कला
७. प्रेमाची शक्ती

तिची यादी ऐकून शिक्षिकेसहित सगळी मुले स्तब्ध होतात. विचार केलेला नसतो की ही सुध्दा जगातली आश्चर्येच आहेत. शिक्षिकेला त्या मुलीच्या विचारांचे आणि बुध्दीचे कौतुक वाटते. ती अचानक टाळ्या वाजवू लागते. तिच्या पाठोपाठ वर्गातली सगळी मुले उभी राहून टाळ्या वाजवू लागतात. प्रथम त्या मुलीला वाटते आपले काही चुकले की काय. परंतु सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ती लाजते. शिक्षिका हळूहळू चालत तिच्या जवळ येते आणि तिला घट्ट मिठी मारते.

पुस्तकात जे लिहिले नाही आणि जे त्यातल्या ज्ञानापलीकडले आहे त्याची जाणीव या लाजऱ्या मुलीने सर्वांना करुन दिलेली असते. शिक्षिकेचे डोळे आनंदाश्रुंनी भरुन येतात.

खरोखर आपण सुध्दा या आश्चर्यांचा कधी विचार करतच नाही. आपण सगळे काही गृहित धरतो. आयुष्याला सुध्दा आणि या छोट्या छोट्या चमत्कारांना सुध्दा. ज्यांच्या. जवळ यातली एक जरी शक्ती नसते त्यांना आयुष्यभर किती गोष्टींना वंचित रहावे लागते याची आपण साधी कल्पनाही करु शकत नाही. पाच इंद्रियांखेरीज आपल्या जवळ असीम प्रेम करायची जी शक्ती आहे त्याचाही आपण विचार करत नाही अथवा ती योग्य तऱ्हेने वापरतही नाही.

त्या लहान मुलीच्या विचाराने आपणही थोडे अंतर्मुख व्हायला हरकत नाही. आपण जेवढा याचा विचार करू तेवढे आपण विस्मयचकीत होऊन जाऊ. जीवनातला आनंद आणि जीवनाची किंमत दोन्ही आपल्याला कळेल यात शंकाच नाही.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..