वडिलोपार्जीत स्थावर मालमत्ता, शेती, जागा, किंवा पै पै जमवून मिळवलेली मालमत्तेची नोंदणी कायद्यानुसार योग्यवेळी होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास त्यासंबधी उद्भवणाऱ्या वादांना सामोरे जाऊन कोर्ट प्रकरणे करावी लागतात. हे टाळण्यासाठी याविषयीच्या कायद्याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासंबंधी उद्भवणाऱ्या वादांना सामोरे जाऊन कोर्ट प्रकरणे करावी लागतात.
हे टाळण्यासाठी याविषयीच्या कायद्याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासंबधी असलेल्या कायद्यांची माहिती अत्यंत सोप्या भाषेत अॅड. सदानंद मानकर यांनी ‘सातबारा व हक्क नोंदणी’द्वारे वाचकांपर्यंत पोचविली आहे.
अधिकार अभिलेख तथा हक्कनोंद सातबाराची पार्श्वभूमी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, जमीन मालकी हक्क सत्ता प्रकारांची नोंद, जमीन देण्याबाबत, देवस्थान वर्ग – ३, इतरांच्या जमिनीतून पाण्याचे पाट बांधणे, गाव, नगर, शहरांच्या जागांतील जमिनी, सीमा व सीमा चिन्हे, भूमीअभिलेख, अधिकार संपादन, माहिती देण्याचे बंधन,
खातेपुस्तिका, फेरफार व विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही, नोंदीचे गृहीत मूल्य, महसुली क्षेत्रे, महसूल अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, महसूल मंडल अधिकारी व मंडल निरीक्षकांची कर्तव्ये व कार्य, अपिले, फेरफार व पुनर्विलोकन, हिंदू उत्तराधिकारी अधिनियम – १९५६ अशा विविध प्रकरणामधून जमीन, मालमत्तेविषयी कायद्यांची संपूर्ण माहिती दिली आहे.
Author: सदानंद मानकर
Category: कायदेविषयक
Publication: चौधरी लॉ पब्लिशर्स
Pages: 312
Paperback
Leave a Reply