चातुर्मास सुरु झालाय आणि सहाजिकच उपवासाचे दिवसही. आषाढी एकादशीही आली. महाराष्ट्रात लाखो लोकांचा हा उपवासाचा दिवस. “एकादशी- दुप्पट खाशी” असा वाक्प्रचार या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रचलित झालाय. कारण सहाजिकच आहे. या दिवशी बर्याच लोकांच्या उपवासाच्या थाळीमध्ये अनेक सुग्रास खाद्यपदार्थ असतात.
बटाट्याचा किंवा रताळ्याचा कीस, शिंगाड्याचा शीरा, उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ, राजगिर्याच्या पुर्या आणि अर्थातच साबुदाण्याची खीर किंवा खिचडी !
या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये वापरल्या जाणार्या साबुदाण्यावरुन एक प्रकारचा गहजब गेले काही महिने इंटरनेटवरुन सुरु आहे. सोशल साईटसवरुन साबुदाण्याविषयी एक संदेश किंवा “पोस्ट” गेले अनेक महिने फिरतोय साबुदाणा साकाहारी की मांसाहारी याविषयी चर्चा करणारा हा पोस्ट. कुठून उत्पन्न झाला.. माहित नाही. खरंतर सोशल साटवरचे बहुतांश पोस्ट नेमके कोणी टाकले, कधी टाकले याची माहितीच उपलब्ध नसते मात्र ते प्रचंड मोठ्या प्रमाणात फोफावतात. खरेखोटेपणाविषयी कोणतीही शहानिशा न करता.
साबुदाण्याविषयी या पोस्टमध्ये जे काही म्हटले आहे त्यामुळे या “खाद्य(?)पदार्था”विषयी किळस वाटणे स्वाभाविक आहे. मात्र या पोस्टमधले म्हणणे खरे असेल तर आत्तापर्यंत हा साबुदाणा बनवणार्या कारखान्यांना FDA चे सील लागायला हवे होते किंवा शाकाहारी मंडळींनी या कारखान्यांवर मोर्चेच काढायला हवे होते. यातील काहीही झालेले दिसत नाही.
साबुदाणा कसा तयार होतो किंवा बनतो याबाबतची माहिती इंटरनेटवरच शोधली. यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती हाती आली. इतर कोणत्याही लहान-सहान साईटवरील माहितीला प्रमाणमाहिती म्हणून न मानता सर्वसाधारणपणे ज्या वेबसाईटसना इंटरनेटच्या दुनियेत काहीतरी स्थान आहे अशा “wikipedia.org”, “in.answers.yahoo.com” या दोन साईटसवरील “साबुदाणा” या विषयावरील लिंक इथे देत आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Sago
https://mr.wikipedia.org/wiki/साबूदाणा
https://in.answers.yahoo.com/question/index?qid=20080918111410AABMV1v
साबुदाणा बनविण्याच्या प्रक्रियेचा युट्युबवरील एक व्हिडिओसुद्धा पहा. यात कुठेही साबुदाण्याच्या निर्मितीबद्दलच्या त्या गाजलेल्या पोस्टमधील कोणत्याही दाव्याचा उल्लेखदेखील नाही.
https://www.youtube.com/watch?v=hM0G6b0I7TI
भारतात साबुदाण्याचे उत्पादन तामिळनाडुतील सालेम परिसरात होते. कोइंबतूर ते सालेम या भागातील हा एक मोठा उद्योग आहे. अनेक लोकांना यातून रोजगार मिळतो. काहींच्या मते या भागातील हा उद्योग बंद पाडण्यासाठी केलेले हे कारस्थान आहे. काहींच्या मते शाकाहारी आणि मांसाहारी यांच्यात कलह लावून देण्याचे हे कारस्थान आहेत.
काहींच्या मते या पोस्टमधील लॉजिक वापरले तर आपल्या नेहमीच्या खाण्यातले दही, चीज, पाव वगैरेसारखे पदार्थही मांसाहारी ठारतील कारण त्यातही fermentation च्या प्रक्रियेसाठी बॅक्टेरिया म्हणजेच एक प्रकारचे सजीव प्राणीच वापरले जातात.
काहीही असो.. खरेखोटे ठरवणारे आपण कोण? या लिंक्सवरील माहिती पहा, व्हिडिओसुद्धा पहा आणि आपणच ठरवा या चातुर्मासात साबुदाणा खायचा की नाही ते.
ही एका प्रकारची खळ (स्टार्च -starch) आहे जी झाडांच्या बुंध्याच्या, मुळांच्या मध्यभागी असेलेल्या ‘pith’ (पिथ ) ह्या ‘spongy’ भागापासून काढली जाते. आपल्याकडे पूर्वी तांदळाची, आरारूट, इत्यादी पासून खळ घरी काढली जात असे. आता तशी कुठे काढली जाते का हा प्रश्नच आहे.
राजकारणी मंडळींचे पांढरे शुभ्र कपडे असेच स्टार्च वापरुन कडक केलेले असतात हे माहित आहे का? इस्त्री करण्यापूर्वी खळ वापरून शर्ट – साड्या स्टार्च कशा करत असत ते आपल्या आई किंवा आजीला विचाराच. पूर्वी याला घरची लॉण्ड्री असेही म्हणत.
साबुदाण्यातील सत्त्व:
साबुदाण्यात मुख्यतः कर्बोहैड्रेट (carbohydrate) असतात; साधारण २५ ग्रॅम साबुदाण्यात १०५ कॅलॉरी (calories). त्यात saturated fats (चरबी), proteins आणि sodium फार कमी प्रमाणात असतात. तर विटामिन्स (vitamins) व शरीराला हवे असलेले धातू (minerals) नसल्यात जमा. त्यामुळे साबुदाण्याचे खाद्य- मुल्य (Food – value) अत्यंत कमी असते.
Leave a Reply