अखेर राज्य शासनांनी २४ तास मॉल , दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाच .आधीच रस्त्यावरील दिवसभर गोंगाटामुळे जनता त्रस्त असतानाच रात्री हीच दुकाने सुरु ठेवण्यास शासनांनी परवानगी दिली आहे.एक विशिष्ठ धन दांडग्यांची लौबी गेली अनेक वर्षे या साठी प्रयत्नशील होती.रात्री १० नंतर नागरिकांचा शांत पणे झोपण्याचा मुलभूत हक्क सरकारनी अत्यंत निर्दय पणे काढून घेतला आहे.
आज ठाणे मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी नियम धाब्यावर बसवून बांधकामे केली आहेत .नवीन होणा-या इमारतीला गेल्या अनेक वर्षा पासून इमारतीच्या स्टील्ट मध्ये गाड्या ठेवण्यासाठी पार्किंग स्पेस ठेवणे सक्तीचे असताना त्या ठिकाणी सर्रास दुकाने काढली जातात .खाली दुकान आणि वर मकान अशीच शहरातील सर्व रस्त्यावर जी बांधकामे होत आहेत त्यांची अवस्था आहे.इमारत बांधताना खाली दुकाना साठी गाळे काढले कि बिल्डर गडगंज पैसा कमावतो .इमारतीत राहणा-या लोकांना त्याच्या गाड्या ,स्कूटर ,सायकली ठेवण्यासाठी जागा नसते ,हीच लोकं गाड्या रस्त्यावर पार्क करतात ,खाली दुकाने काढल्याने दुकानात येणारे ग्राहक आपापल्या गाड्या दुकाना समोर लावतात .शहरातील अनेक रस्ते अश्या अनधिकृत पार्किंग नि पूर्ण पणे व्यापले गेले आहेत .
वाहनांचा कर्कश्य आवाज ,धूर .वाहतूककोंडी यामुळे जनता आधीच त्रस्थ आहे.यात आता दिवसरात्र दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. सरकार नक्कीच धनदांडग्यांच्या दबावा खाली काम करते आणि नेत्यांना शहराचा बट्ट्याबोळ झाला तरी त्याची फिकीर नाही हेच असे निर्णय घेण्या मागील कारण असावे.
फेरीवाल्यांचा प्रश्न सुटला नाही आणि त्यात हे पुन्हा नवे संकट !!!
सरकार चे डोके ठिकाणावर आहे का ?
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply