साहित्य :
१ कप साबुदाणे
३ ते ४ मध्यम जाडीचे बटाटे
१/२ कप शेंगदाणे
१ चमचा जिरे
१ ते २ बारीक चिरलेल्या मिरच्या.
१ चमचा आल्याचे बारीक कापलेले तुकडे.
२ चमचे लिंबाचा रस.
बारीक कापलेली कोथिंबीर
दिड चमचा साखर
३ चमचे शिंगाड्याचे पीठ
चवीप्रमाणे मीठ.
तळण्यासाठी तूप
कृती :
१. साबुदाणे कमीतकमी ५ तास किंवा आदल्या रात्री भिजत ठेवणे, जेणेकरून साबुदाणे नरम व मुलायम होतील.
२. साबुदाण्यातील पाणी संपूर्ण निथळावे
३. बटाटे उकडून घ्यावेत. साले काढून ती सोलून घ्यावीत
४. साबुदाणे व बटाटे एकत्रित कुस्करून घ्यावेत.
५. तव्यावर किंवा सपाट फ्राईंग पॅनवर शेंगदाणे खुशखुशीत भाजणे
६. शेंगदाणे थंड करून त्याचे जाडसर कुट करणे.
७. शेंगदाण्याचे कुट, मीठ साखर, आले, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, लिंबाचा रस, शिंगाड्याचे पीठ आणि पाणी – ह्या सर्वांचे चांगले मिश्रण करावे.
८. मिश्रणाचे हाताने छोटे-छोटे वडे बनवावे.
९. हे वडे भरपूर तेलात तांबूस होई पर्यंत तळावेत
१०. चटणी किंवा दही ह्या बरोबर साबुदाणा वड्यांची मजा घ्यावी.
Leave a Reply