झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही,
विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी …१
विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला
ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२
चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा,
शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३
एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती
एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती…४
चित्त करूनी एकाग्र, दिशा त्यास या प्रभूसाठीं
मिळेल सारे तुम्हां, जागृत राहण्या पोटीं…५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply