नवीन लेखन...

सदृढ शरिरी चिंतन

योजना तुमची चुकून जाते,  जीवनाच्या टप्प्याची
अखेरचा क्षण जवळीं येतां,  आठवण होते त्याची

जोम असतां शरिरीं तुमच्या,  करिता देहासाठीं
वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता,  प्रभू चिंतना पोटीं

गलित होऊनी गेली गात्रे,  अशांत करी मनां
एकाग्रचित्त होईल कसे तें,  मग प्रभू चरणां

दवडू नका यौवन सारे,  ऐहिक सुखामागें
त्या काळातील प्रचंड ऊर्जेस,  लावा प्रभूचे मार्गे

सदृढ असते शरीर जेव्हां,  एकाग्र करा चित्त
मिळणाऱ्या त्या ऊर्जेला तुम्हीं,  खर्च करा चिंतनांत

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..